जळगाव जिल्ह्यात अवघ्या चोविस तासाच्या अंतरात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

0
1

साईमत जळगाव  प्रतिनिधी

जिल्ह्यात अवघ्या चोवीस तासाच्या अंतरात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे.
पारोळा तालुक्यातील चोरवड येथील हेमराज शेखर पाटील (वय २७) यांच्याकडे सुमारे चार एकर शेती आहे. यंदा शेतीत कापसाची लागवड केली होती. कापसाच्या पिकासाठी त्यांनी पीककर्जही घेतले होते. परंतु नैराश्यातून त्यांनी मध्यरात्री एकच्या सुमारास आपल्या शेतात विषारी औषध प्राशन केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दुसरी घटना तालुक्यातील कुऱ्हा-हरोदो येथील शेतकरी शंकर कृष्णा माळी (वय ४२) यांनी कर्जाला कंटाळून आपल्या घरातील छताच्या लाकडी सरईला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतकरी शंकर माळी यांनी शेतामध्ये पेरणी केली होती. शंकर माळी यांनी पेरणीसाठी विविध कार्यकारी सोसायटीकडून एक लाख कर्ज आणि काही खासगी बचत गटाच्या कर्ज काढले होते. शेतकरी माळी हे मंगळवारी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले. त्यानंतर दुपारी तीनपर्यंत घरी आले आणि लगेच साडेचारला छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here