साईमत जळगाव प्रतिनिधी
गोदावरी फाऊंडेशनतर्फे मोफत हृदयरोग निदान व संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आले होते. या शिबिरात हृदयविकाराचे लक्षणं आढळून आलेल्या १६० जणांची टू डी इको तपासणी तर ३१४ शिबिरार्थींची ईसीजी कार्डिओग्राफ तपासणीही यावेळी करण्यात आली.
शिबिरासाठी डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयाच्या हृदयालयातील डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, मेडिसीन तज्ञ डॉ.तुषार पाटील, निवासी डॉ.विशाल चव्हाण, सर्जरी विभागातील डॉ.गजानन गवळी, नेत्ररोग निवासी डॉ.नेहा नारखेडे, ऑर्थोचे निवासी डॉ.गौतम कुंभार यांनी शिबिरार्थींची आरोग्य तपासणी केली. याशिवाय ज्यांना हृदयविकाराचा त्रास होता किंवा हृदयविकारासारखी लक्षणे किंवा शंका असलेल्या शिबिरार्थींची टू डी इको तपासणी अर्थात हृदयाची सोनोग्राफीही मोफत करण्यात आली. टू डी इको तपासणीचा रिपोर्ट हृदयविकार तज्ञ डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांना दाखविण्यात आला असून त्यानुसार पुढील उपचार सुचविण्यात आले. या शिबिराचा ३१४ शिबिरार्थींनी लाभ घेतला.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सत्र न्यायालय, जळगाव येथील बार काउंसिलचे अध्यक्ष अॅड.केतन जयदेव ढाके, उपाध्यक्ष अॅड.वैशाली महाजन, सचिव अॅड स्वप्नील पाटील, खजिनदान अॅड.विशाल घोडेस्वार, कार्यकारी सदस्य अॅड निलेश जाधव यांच्यासह डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील मार्केटिंग मॅनेजर रत्नशेखर जैन, तंत्रज्ञ जैस जोस, मकरंद महाजन, अमोल पाटील, सुरज नारखेडे आदिंचे सहकार्य लाभले.



