Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन लिपिक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
    क्राईम

    जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन लिपिक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

    SaimatBy SaimatMarch 9, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायत निवडून आलेल्या सदस्याला ३ अपत्यबाबत दाखल तक्रारी संदर्भात चांगला अहवाल सादर करण्यासाठीच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील दोन लिपिकांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

    याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत तक्रारदार निवडून आले होते. परंतु त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात तीन अपत्य असल्याने त्या संदर्भात एकाने तक्रारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान ग्रामपंचायत विभागात कार्यरत असलेले महेश रमेशराव वानखेडे वय-३० आणि समाधान लोटन पवार वय-३५ या दोघांनी तक्रारदाराला तीन अपत्यबाबतचा चांगला अहवाल तयार करून देतो, त्यामुळे तुम्ही अपात्र होणार नाही, यासाठी ३० हजार रुपयांची लाचीची मागणी केली. दरम्यान तक्रार यांनी शनिवारी ९ मार्च रोजी लाचलुचपत विभागात तक्रार दिली. दरम्यान पथकाने सापळा रचून संशयित समाधान लोटन पवार हे ३० हजार पैकी २०हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
    सदर कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी, अमोल वालझाडे, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रणेश ठाकूर,राकेश दुसाने प्रदीप पोळ आदींनी केली.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Amalner:चार जणांकडून साईड न दिल्याच्या वादातून व्यापाऱ्याच्या कारची तोडफोड

    February 20, 2026

    Dhule : धुळ्यातील पिंपळनेर हादरले; आनंदोत्सवात धारदार शस्त्रांचा कहर

    February 20, 2026

    Jalgaon : जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव २०२६’ची रंगतदार मेजवानी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.