साईमत, नाशिक: प्रतिनिधी
अधिक मासात लेक-जावयाला यथायोग्य पाहुणचार करण्याची परंपरा आहे. चांदीचे ताट, ताह्मण, निरांजन, गाय-वासरूची प्रतिकृती, दागिना देण्याची प्रथा आजही कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील सराफ बाजारात महिन्याभरात कोटींची उलाढाल झालेली आहे.
दर तीन वर्षांनी एकदा अधिक महिना येतो. या महिन्यात जावयाला घरी बोलावून पंचपक्वान्न जेवण देण्यासह विविध सोन्या-चांदीच्या वस्तूंची भेट देण्याची परंपरा आजही पाळली जाते. 18 जुलैपासून सुरू झालेल्या अधिक मासाचा शेवट 15 ऑगस्टला झाला. या काळात सराफा बाजाराला मोठी झळाली मिळालेली दिसली. चांदीचे ताट, ताह्मण, निरांजन, गाय-वासरू, ताट, भांडे, समई, चांदीचे दिव्ो, कॉइन, तसेच सोन्याची अंगठीची बाजारपेठेत चलती होती. अधिक मासात सराफ बाजारात झालेली उलाढाल श्रावणात कायम राहील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे, चांदीच्या छोट्या वस्तूंना अधिक मागणी होती. फॅन्सी जोडव्ो, नक्षीकाम केलेल्या जोडव्यांसह इटालियन जोडव्यांना मागणी होती. महिनाभर सराफ बाजारात खरेदीसाठी गर्दी झाल्याचे चित्र होते.
अधिक मासाला सुरवात झाल्यानंतर 18 जुलैला चांदी 77 हजार सातशे रुपये, तर सोने 61 हजारांपर्यंत होते. अधिक मास संपेपर्यंत 15 ऑगस्टला चांदी 72 हजार पाचशे, सोने 60 हजार 550 रुपयांपर्यंत भाव उतरले आहेत.लेकीला जोडव्ो तर जावयाला अंगठी, चांदीचे भांडे, कॉइन देत अधिक मासाला भेटवस्तू देण्याची परंपरा जपली गेली.