Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»Amalner : श्रीमंत प्रताप शेठ यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त प्रताप महाविद्यालयात अभिवादन
    अमळनेर

    Amalner : श्रीमंत प्रताप शेठ यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त प्रताप महाविद्यालयात अभिवादन

    saimatBy saimatDecember 13, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Greetings at Pratap College on the occasion of its birth anniversary
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ही जयंती उत्साहात व श्रद्धेच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

    साईमत/अमळनेर/प्रतिनिधी :  

    येथील प्रताप महाविद्यालयात आज श्रीमंत प्रताप शेठ यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतिचिन्हास व छायाचित्रास माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ही जयंती उत्साहात व श्रद्धेच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

    कार्यक्रमाची सुरुवात निवडणूक उपसमितीचे चेअरमन पंडित रामचंद्र चौधरी, खान्देश शिक्षण मंडळाचे चिटणीस तथा उपप्राचार्य प्रा.पराग पाटील आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एच.डी.जाधव यांच्याहस्ते श्रीमंत प्रताप शेठ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.

    स्व.प्रताप शेठ हे परिसरातील शिक्षण, समाजकारण आणि दातृत्वासाठी ओळखले जाणारे दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम व परवडणारे शिक्षण मिळावे, हा त्यांचा दृढ संकल्प होता. त्यांच्या या विचारातूनच प्रताप महाविद्यालयाची स्थापना झाली असून, आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला शिक्षणाच्या माध्यमातून नवी दिशा मिळाली आहे.

    याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ.अशोक पाटील, प्रा.डॉ.योगेश तोरवणे, प्रा. डॉ. विजय मांटे, आयक्यूएसी समन्वयक प्रा.डॉ.मुकेश भोळे, प्रा.डॉ.कुबेर कुमावत, प्रा.डॉ.कैलास निळे, प्रा.डॉ.शाना बागूल, प्रा.डॉ.जितेंद्र पाटील, प्रा.विजय साळुंखे, प्रा. डॉ.तुषार रजाळे, प्रा.डॉ.भरतसिंग पाटील, प्रा.यू.जी.मोरे, प्रा.वसंत पाटील, प्रा. किरण पाटील, प्रा. सोनूसिंग पाटील, प्रा. पावरा, महाविद्यालयाचे कुलसचिव राकेश निळे, कार्यालय अधीक्षक देवेंद्र कांबळे, जयदेव भदाणे, बापू पाटील, अजय साटोटे, कमलाकर पाटील, धना भोई, महेंद्र पाटील, शर्मा यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी पुष्प अर्पण करून श्रीमंत प्रताप शेठ यांना अभिवादन केले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026

    Amalner:चार जणांकडून साईड न दिल्याच्या वादातून व्यापाऱ्याच्या कारची तोडफोड

    February 20, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.