‘इको क्लब फॉर मिशन लाईफ’ अंतर्गंत पर्यावरण दिन साजरा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील साने गुरुजी कॉलनीतील स्थित खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये ‘इको क्लब फॉर मिशन लाईफ’ अंतर्गंत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातंर्गंत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. यासाठी शाळेच्या परिसरात इको क्लबचे विद्यार्थी, सदस्य आणि त्यांच्या आई स्वप्ना कुलकर्णी यांना आमंत्रित केले होते. यावेळी स्वप्ना कुलकर्णी, दीपक पाटील यांच्या हस्ते करंजच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी जळगाव येथील सामाजिक वनीकरणाचे अधिकारी दीपक पाटील, मुख्याध्यापक एस.पी. निकम, उपमुख्याध्यापक जे.एस.चौधरी, पर्यवेक्षक के.आर.पाटील, राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख संजय बाविस्कर, इको क्लबचे अध्यक्ष एस.के.तायडे, आशिष पाटील, नरेश फेगडे, इको क्लबचे विद्यार्थी प्रतिनिधी सदस्य जान्हवी कुलकर्णी, सूर्या कुलकर्णी, दिव्या ठाकरे, भाग्यश्री कोळी, झोया शेख, निशा चव्हाण आदी उपस्थित होते.
प्रेमाखातर मुलीने केलेल्या वृक्षारोपणाबद्दल आनंद
यावेळी इको क्लबची विद्यार्थिनी प्रतिनिधी जान्हवी कुलकर्णी हिने करंज वृक्षाची निगा राखून संगोपन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी तिची आई स्वप्ना कुलकर्णी यांनी प्रेमाखातर मुलीने केलेल्या वृक्षारोपणाबद्दल आनंद व्यक्त केला. शाळेचे मुख्याध्यापक एस. पी.निकम यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगत निसर्गाविषयी मार्गदर्शन केले.



