Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»लोहारा ग्रा.पं.ची उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून ‘झाडाझडती’
    पाचोरा

    लोहारा ग्रा.पं.ची उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून ‘झाडाझडती’

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 14, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गावातील समस्यांची अधिकाऱ्यांनी पायी फिरून केली प्रत्यक्ष पाहणी

    साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी :

    येथील ग्रामपंचायतीच्या समस्यांबाबत ग्रामस्थांनी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे नुकताच समस्यांचा पाढा वाचत तक्रार केली होती. त्यावर ना .महाजन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठविण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला होता. त्यानुसार बुधवारी, १४ ऑगस्ट रोजी जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) अनिकेत पाटील, पाचोऱ्याच्या गटविकास अधिकारी स्नेहल शेलार, विस्तार अधिकारी राजेंद्र धस यांनी लोहारा ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यानंतर सरपंच अक्षय जैस्वाल, ग्रामविकास अधिकारी गजानन काळे यांची झाडाझडती घेतली. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार समस्यांच्या पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष पायी फिरून समस्या जाणून घेतल्या.

    गावातील कन्याशाळेच्या मागील अंगणवाडी क्रमांक ०२१३ याठिकाणी भेट देत अंगणवाडी समोरच भले मोठे पाण्याचे डबके आणि अस्वच्छता दिसून आली. याबाबत ग्रामप्रशासनाला वेळोवेळी सांगूनही त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले. ३ते ६ या वयोगटातील लहान बालक अंगणवाडीत येत असतात. अशा घाणीच्या प्रकारामुळे बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्नच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर आठ दिवसात ही समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या. कन्या शाळेच्या एका बाजूला कंपाउंड नसल्याने शाळेत शौचास बसत असल्याने व मुक्त गुरे-ढोरे फिरतात. त्याठिकाणी कंपाऊंड करण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिले.

    गावात स्वच्छता करण्याच्या दिल्या सूचना

    शितला माता मंदिर परिसरात महिला शौचालयाची दुरावस्था, अस्वच्छता याबाबत स्थानिक महिलांनी तक्रार करत ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. वेळोवेळी साफसफाई, स्वच्छता करण्याची मागणी महिलांनी केली. तसेच बाजारपेठ भागाची पाहणी त्या परिसरातील अंगणवाडीची पाहणी केली. स्मशानभूमीचीही पाहणी करत साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या.

    आठ दिवसांनी पुन्हा भेट देणार

    महिला शौचालयाची दुरावस्था, म्हाडा कॉलनी रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी म्हाडाचे अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच यांच्यासमवेत एकत्रित बैठक लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रथमेश मराठा समाजाला विकसित करण्यासाठी दिलेल्या म्हाडा कॉलनीतील जागेसंदर्भात म्हाडा, जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून हस्तांतरीत करण्याच्या सूचना दिल्या. गावातील सर्व समस्यांचा सर्व्हे करून त्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना दिल्या. तसेच आठ दिवसांनी पुन्हा भेट देणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी सांगितले.

    यांची होती उपस्थिती

    पाहणी करतांना त्यांच्यासमवेत गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी गजानन काळे, सरपंच अक्षय जैस्वाल, उपसरपंचपदी दीपक खरे, ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, संभाजी चौधरी, नंदू सुर्वे, दत्तात्रय भोसांडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    मूलभूत सुविधांपासून ठेवले वंचित

    म्हाडाच्या जागेत घर नं.६ मध्ये गेल्या आठ वर्षापासून रहिवासी आहे. येथील सरपंच यांनी त्याठिकाणी पिण्याचे पाण्याचे नळ दिले नाही. आठ वर्षापासून विहिरीवरून पाणी भरत आहे. दोन वेळेस मूलभूत सुविधा मिळण्याकामी ऑनलाईन अर्ज केला. तरीही त्याला त्यांनी ‘केराची टोपली’ दाखवत अर्ज बाजूला ठेवला. तुम्ही राहत असलेल्या म्हाडाचे कोणतेही कागदपत्रे माझ्याकडे आलेले नाही, असे सांगत त्यांनी मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले आहे.मात्र, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रत्यक्ष गावात आल्यामुळे न्याय मिळेल, अशी अपेक्षा बाळगतो.

    -नाना हिरामण पवार (लोहारा, म्हाडा रहिवासी)

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.