गटबाजीला कंटाळून धुळ्यातील मोठ्या नेत्याचा राष्टवादीला राम राम ; पवारांना आणखी एक धक्का

0
55
गटबाजीला कंटाळून धुळ्यातील मोठ्या नेत्याचा राष्टवादीला राम राम-saimatlive.com

साईमत धुळे प्रतिनिधी

नुकतंच झालेल्या सरकार स्थापनेच्या खेळामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड पुकारला, यामध्ये अजित पवार यांच्यासह अनेक आमदार व नेत्यांनी भाजप – शिवसेनेला आपला पाठिंबा दिल्याने राष्टवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडली आहे. या झालेल्या बंडामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलाच मोठा धक्का बसला असून शरद पवार यांनी पक्ष वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. एकाबाजूला शरद पवार आपला पक्ष सावरण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असतानाच राष्टवादीला अजून एक धक्का बसला आहे. पक्ष्याच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून धुळ्यातील नेत्याने पक्षाला सोडचिठी दिली आहे. धुळ्याचे माजी आमदार तथा राष्टवादीचे काँग्रेस पक्षचे उपप्रदेश अध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी राष्टवादीला पुन्हा हरिओम पक्षाला राम राम केले आहे. अनिल गोटे यांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्टीकडे सोपविला असून मी सध्यातरी कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे गोटे यांनी स्पष्ट केले आहे.

पत्रकार परिषद घेत गोटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीमुळे गोटे यांची अनेक दिवसांपासून घुसमट होत होती. या अगोदर देखील पक्षश्रेष्ठींच्या जाहीर कार्यक्रमात गोटे यांनी पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती, आणि त्याचमुळे या सर्व गटबाजीला कंटाळून आपण राष्टवादी काँग्रेसला (NCP) सोड चिठी देत असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here