रुग्णांच्या सेवेसाठी शासनाकडून मिळतेय वेळोवेळी मदत : पालकमंत्री

0
51

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

येथील शासकीय विश्रामगृह येथे भव्य मोफत दिव्यांग तपासणी शिबिर नुकतेच घेण्यात आले. त्यात जळगाव ग्रामीण मतदारसंघातून शिबिरास १२ हजार रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातून डॉक्टरांची टीम सहभागी झाल्याने आरोग्य तपासणी शिबिरास महत्त्व प्राप्त झाले होते. व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिता कोल्हे -माळी, जळगाव शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, डॉ.अमित भंगाळे, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, सचिन पवार, संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी संजय चव्हाण, शेतकरी संघाचे संचालक संजय महाजन यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णांच्या सेवेसाठी शासनाकडून वेळोवेळी मदत दिली जाते. त्या माध्यमातून शिवसेना मागासवर्गीय सेनेच्यावतीने शिबिराचे आयोजन केले होते. त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघातून विविध गावांमधून आलेल्या रुग्णांचा सहभाग याठिकाणी दिसून आला. डॉक्टरांनी तपासण्या केल्याने रुग्णांना दिलासा मिळाला. आगामी काळात अशा मोफत शिबिराचे आयोजन करून जास्तीत जास्त लोकांना मदत व्हावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

शिबिरात अस्थिरोग रुग्ण ९६२, नेत्र तपासणी १ हजार ७८०, कृत्रिम लेंस करता ५१३, नाक,कान, घसा तपासणी ८३५, मानसिक १ हजार ३६८, कॅन्सर ६५१, क्षयरोग डीपी मधुमेह व जनरल तपासणी १ हजार ८३१, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी ६००, आभा कार्ड नोंदणी ३ हजार २४१, महात्मा फुले जीवनदायी योजना ५५० नागरिकांची नोंद झाली.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी सचिन बिराडे, आबा माळी, मोहन शिंदे, अमोल गजरे, प्रणय नन्नवरे, पप्पू तिवारी, अमोल पाटील, अनिल पंडित, कैलास पाटील, गोपाल सोनवणे, दीपक झंवर, मुन्ना झंवर, रोहन भालेराव, अनिल माळी, नवल पारधी आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक शिवसेनेचे मागासवर्गीय सेना जिल्हाप्रमुख तथा माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे तर सूत्रसंचालन मुकुंद गोसावी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here