सोयगाव : प्रतिनिधी
छायाचित्रओळ-सोयगाव पंचायत समितीच्या गणांच्या आरक्षण सोडती दरम्यान तहसीलदार रमेश जसवंत,उपविभागीय अधिकारी संजीव मोरे व इतर,दुसऱ्या छायाचित्रात लहान मुलाच्या हाताने चिट्ठीद्वारे सोडत काढतांना. सोयगाव, दि.२८…आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी गुरुवारी पंचायत समितीच्या सहा गणांची सोडत काढण्यात आली.या आरक्षण सोडतीत पंचायत समितीच्या सहा गनांपैकी सावळदबारा,बनोटी आणि आमखेडा हे तीन गण महिलांसाठी राखीव झाले असून फर्दापूर,निंबायती आणि गोंदेगाव या तीन गणासाठीच पुरुषांना संद्झी मिळाली असून सोयगावला जिल्हा परिषदेचे तिन्हीही गट अनुसूचित जाती साठी राखीव झाल्याने दिग्गजांचे राजकीय स्वप्न धुळीस मिळाले आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी गुरुवारी सोयगाव पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समितीच्या सहा गणांसाठी आरक्षण व सोडत काढण्यात आली यावेळी नियंत्रण अधिकारी उपविभागीय अधिकारी संजीव मोरे,तहसीलदार रमेश जसवंत,नायब तहसीलदार विठ्ठल जाधव.गोरखनाथ सुरे,निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार हेमंत तायडे, पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या उपस्थितीत आरक्षण व सोडत काढण्यात आली यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या साठी जागा आरक्षित करतांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार लोकसंख्येच्या उतरता क्रम आणि चक्रानुक्रम नुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली यामध्ये आमखेडा गण-अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाला तर सावळदबारा गण अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाला आहे.नागरिकांचा मागासप्रवर्ग साठी आरक्षण काढण्यासाठी चिट्ठी द्वारे हि सोडत काढण्यात आली यासाठी अरसलान इरफान सय्यद या विद्यार्थ्याच्या हाताने बंद डब्यात चिठ्ठ्या टाकून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली यामध्ये गोंदेगाव गण-नागरिकांचा मागासप्रवर्ग साठी पुरुष गटासाठी राखीव झाला असून एकाच गणावर ओ,बी,सी ला समाधान मानावे लागले आहे,निंबायती आणि फर्दापूर हि दोन्ही गण सर्वसाधारण गटासाठी अनारक्षित झालेले असल्याने या दोन गणात मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे राजकीय चित्र आहे.
विद्यमान उपसभापती साहेबराव गायकवाड(शिवसेना) यांचा गोंदेगाव गण नागरिकांचा मागास्प्रवार्गासाठी सुटला असल्याने त्यांना फटका बसला असून विद्यमान सभापती प्रतिभा जाधव यांचा बनोटी गण सर्वसाधारण महिलेकडे राखीव झाल्याने त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे.आमखेडा अनुसूचित जमातीसाठी तर सावळदबारा अनुसूचित जाती साठी राखीव झाल्याने पंचायत समितीच्या निवडणुकीत निंबायती,फर्दापूर,गोंदेगाव आणि बनोटी या चार गणांसाठी चुरशी रंगणार आहे.
—–पंचायत समिती गणांचे आरक्षण खालीलप्रमाणे—
आमखेडा-अनुसूचित जमाती महिला
निंबायती-सर्वसाधारण
गोंदेगाव-ओ.बी.सी पुरुष
फर्दापूर-सर्वसाधारण अनारक्षित
बनोटी –सर्वसाधारण महिला
सावळदबारा-अनुसूचित जाती महिला
—–जिल्हा परिषदेच्या तीनही गटांचे अनुसूचित जाती साठी आरक्षित झाले असून आमखेडा-अनुसूचित जाती-पुरुष बनोटी-गोंदेगाव –अनुसूचित जाती-सर्वसाधारण,आणि फर्दापूर-अनुसूचित जाती महिला याप्रमाणे आहेत.