साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी
तालुक्यातील पिंप्राळा ग्रामपंचायत मध्ये मोठा आर्थिक घोटाळा झालेला असून त्या संदर्भात तक्रार केल्याचा राग आल्याने एकाने दोघांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यावरून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा ग्रामपंचायत येथे मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याच्या कारणाने संविधानिक मार्गाने जनतेच्या समोर आर्थिक घोटाळा आणण्यासाठी तसेच वंचितांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने पिंप्राळा येथील राहुल गोपाळ झाल्टे तसेच मुक्ताईनगर येथील सईद खान शब्बीर खान यांनी तक्रारी केली त्यामुळे पिंप्राळा येथील रामकृष्ण उर्फ मिलिंद झाल्टे यांच्या विरुद्ध मुक्ताईनगर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान राहुल झाल्टे यांनी पिंप्राळा ग्रामपंचायत मध्ये घोटाळा झाला संदर्भात 2 मे 2024 रोजी मुक्ताईनगर गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे माहिती अधिकार टाकला होता. त्यासोबतच मुक्ताईनगर येथील सईद खान शब्बीर खान यांनी सुद्धा पिंप्राळा ग्रामपंचायत मध्ये रमाई घरकुल आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेत घोटाळा झाला असून त्याची चौकशी करण्यात यावी यासंदर्भात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगावचे प्रकल्प संचालक यांच्याकडे सुद्धा अर्ज करण्यात आला होता.