एसटी महामंडळाचे हजारो लिटर डिझेल जमिनीत झिरपले की कर्मचाऱ्यांकडून विल्हेवाट लागली…?

0
5

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी

एस टी महामंडळ जळगाव विभाग नियंत्रक यांच्या कार्यक्षेत्रातील यावल एसटी आगारातील भूमिगत डिझेल टाकीतील हजारो लिटर डिझेल स्टॉक रजिस्टरला कमी पडल्याने जमिनीतील डिझेल टाकीला गळती लागून जमिनीत झिरपले किंवा संबंधित कर्मचाऱ्यांनी हजारो लिटर डिझेलची विल्हेवाट लावली आहे किंवा कसे? याची चौकशी जळगाव विभाग नियंत्रक स्तरावरून आणि डिझेल कंपनी कडून आज गुरुवार दि. 23 मार्च 2023 पासून सुरू झाली याबाबत यावल आगार प्रमुख म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेले डेपो मॅनेजर दिलीप महाजन यांनी दुजोरा दिला आहे तरी यावल आगारातील डिझेल पंपाला सील ठोकण्यात आले असून पुढील चौकशी वरिष्ठ स्तरावरून सुरू झाल्याने लवकरच वस्तुस्थिती समोर येईल असे त्यांनी सांगितले.

एसटी महामंडळाचे जळगाव जिल्ह्यात एकूण 11 डेपो आहेत डेपोतील कार्यशाळेत दररोज एसटी बसची दैनंदिन तपासणी होत असली तरी मात्र यावल आगाराचा कारभार गेल्या दोन-तीन वर्षापासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रामभरोसे सुरू होता यामुळे बराचसा दैनंदिन कारभार विस्कळीत झालेला होता परंतु गेल्या दोन-तीन महिन्याच्या कालावधीत नव्याने रुजू झालेले आगार प्रमुख दिलीप महाजन यांनी यावल आगारात कर्मचाऱ्यांना एक शिस्त लावून प्रवासी वाहतूक बऱ्याच मोठ्या प्रमाणात सुरळीत व नियमित केली.

अशाप्रकारे समाधानकारक कामकाज असताना तसेच महामंडळाचा कारभार सुरू असताना यावल आगारातील स्टॉक रजिस्टरला डिझेलची हजारो लिटरची ( अंदाजे पाच ते सहा हजार लिटर डिझेल ) तफावत आढळून आल्याने जळगाव विभाग नियंत्रक आणि डिझेल कंपनी यांच्या लक्षात आल्याने आज दि.23 रोजी दुपारी 12 ते 2 वाजेच्या सुमारास जळगाव विभाग स्तरावरील महामंडळाचे अधिकारी आणि डिझेल कंपनीचे संबंधित यावल आगारात येऊन प्राथमिक स्वरूपात चौकशी केली आणि डिझेल पंपाला सील लावून पुढील चौकशी लवकरच करणार आहे या चौकशीत यावल आगारातील डिझेलच्या टाकीला जमिनीत गळती लागली आहे किंवा कसे ? किंवा यावल आगारात डिझेल येत असताना कमी प्रमाणात आले आहे का..? किंवा एसटीमध्ये डिझेल भरताना किंवा इतर वेळेस काही गैरप्रकार झालेला आहे का इत्यादी चौकशी आणती वस्तुस्थिती लवकरच महामंडळाच्या निदर्शनास आणि नागरिकांच्या समोर येईल असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. डिझेलच्या तफावतीमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here