शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण होतोय ; खते सरसकट बोगस नाहीत

0
12

साईमत पुणे विवेक ठाकरे खास प्रतिनिधी

– राज्यात शेतकरी हवालदिल असताना राज्यातील तब्बल २५ खत कंपन्यांची खते बोगस असल्याने कृषी विभागाने कारवाई सुरू केल्याची माहिती पुढे आली होती. तथापि समाज माध्यमांवर शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण केला जात असून सरसकट खते बोगस असतात असे नाही तर काही कंपन्यांच्या खतात असलेल्या मांत्रांचे प्रमाण कमी असल्याने अशी खते अप्रमाणित असतात,अशी स्पष्टोक्ती राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने ‘साईमत’ जवळ करण्यात आली.सद्द्याच्या हंगामात बोगस खतांच्या आवाईवर शेतकऱ्यांत असलेले भीतीचे वातावरण पाहता प्रस्तुत प्रतिनिधीने वास्तव जाणून घेण्यासाठी कृषी विभागाचे निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे कृषी संचालक विकास पाटील यांच्याशी बातचीत केली.
अप्रमाणित खत कंपन्यांवर कारवाई –
शेतकरी ज्या टक्क्यांत नत्र,स्फुरद आणि पालाश अपेक्षित असलेले खत खरेदी करतो त्याला त्याच प्रमाणात खते मिळाली पाहिजे.
तथापि काही खत कंपन्या जाहीर केलेले अन्नद्रव्य आपल्या खतात पुरवीत नसल्यास अशी खते बोगस नव्हे तर अप्रमाणित असून अशा अप्रमाणित कंपन्यांवर राज्याच्या कृषी विभागाची करडी नजर असून कायद्याप्रमाणे अशा कंपन्यांवर तीन टप्प्यांत असल्याप्रमाणे बंदीची प्रक्रिया करता येवू शकते व कृषी विभागाने तसे ठोस पाऊले उचलल्याचे सुद्धा श्री.पाटील यांनी नमूद केले.
बोगस व भेसळयुक्त खत कंपन्या 
अडचणीत येणार – 
थेट खताच्या नावावर माती विकणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांची लूट चालवल्याच्या तक्रारी यावर्षी जास्त असून या खरिपात राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांना फटका बसत असल्याबाबत कृषी विभागाची भूमिका काय यावर विकास पाटील यांनी स्पष्ट केले की,राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करून बोगसगिरी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा कडक कायदा राज्याच्या पावसाळी अधिवेशनात कृषी मंत्र्यांनी जाहीर केल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होवूच नये म्हणून कृषी विभाग अधिक सजग आणि कठोररित्या आणि पहारेदराच्या भूमिकेत आहे.कृषी विभागाने थेट २४ तास ७ दिवस कार्यरत तक्रार विभाग सुरू केला आहे.बियाणे,खते व कीटकनाशके आदींबाबत तक्रारींचे निवारण करण्यासाठी कृषी विभागाने ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित केला असून व्हाट्सॲप संदेशाद्वारे शेतकरी यांनी तक्रार नोंदवावी.तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवून तत्काळ कारवाई करण्यासाठी कृषी विभाग तत्पर असल्याचे श्री.पाटील म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here