Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Theft in Golani Market : गोलाणी मार्केटमध्ये चोरी ; ५० हजारांच्या मोबाईलवर चोरट्यांचा डल्ला
    क्राईम

    Theft in Golani Market : गोलाणी मार्केटमध्ये चोरी ; ५० हजारांच्या मोबाईलवर चोरट्यांचा डल्ला

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 13, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील गोलाणी मार्केटमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी एका मोबाईलच्या दुकानातून रिपेअरिंगसाठी आलेले ५० हजार १०० रुपयांचे पाच मोबाईल चोरून नेले आहेत. त्यानंतर चोरट्यांनी याच मार्केटमधील कुशल इंटरप्राईजेस आणि रियल मी सर्व्हिस सेंटर ही दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर असे की, मनुमाता नगरात राहणारे अजयसिंग नागेंद्र राजपूत (वय ३९) यांचे गोलाणी मार्केटमध्ये ‘पूजा मोबाईल’ नावाचे दुकान आहे. रविवारी, १० मे रोजी ते रात्री दुकान बंद करून घरी गेले होते. सोमवारी पहाटे ललित गोरखा नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन करून दुकानाचे कुलूप तोडल्याची माहिती दिली. राजपूत यांनी तातडीने दुकानावर जाऊन पाहणी केली. तेव्हा चोरट्याने त्यांच्या दुकानातून दुरुस्तीसाठी आलेले पाच मोबाईल आणि १०० रुपये चोरून नेल्याचे आढळून आले.

    सीसीटीव्हीची तोडफोड, वायफायचेही नुकसान

    चोरट्याने दुकानात चोरी करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली.तसेच वायफाय कनेक्शनचेही नुकसान केले. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.