Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»नमस्कार केल्याने कार्यकर्त्याचा गळाच दाबला
    क्राईम

    नमस्कार केल्याने कार्यकर्त्याचा गळाच दाबला

    saimatBy saimatAugust 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाटणा ः

    राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहार सरकारमधील वनमंत्री तसेच पर्यटनमंत्री तेज प्रताप यादव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडीओ २२ ऑगस्टचा आहे. हा व्हिडीओ सेलार कला गावातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मंत्री तेज प्रताप यादव संतापून एका तरुणाचा चक्क गळा पकडताना दिसत आहेत. त्यानंतर तेज प्रताप या तरुणाला धक्का देऊन दूर लोटतानाही दिसत आहेत.

    कारण अस्पष्ट

    प्राप्त माहितीनुसार, तेज प्रताप यादव यांनी ज्या तरुणाला धक्का दिला त्याचे नाव सुमंत यादव असे आहे. सुमंत हा पक्षाचा कार्यकर्ता आहे. सुमंत यादव गोपालगंज जिल्हा केसरी स्पर्धा जिंकणारे कुस्तीपटू बंका यादव यांचा मुलगा आहे. तेज प्रताप यादव यांनी अचानक सुमंत यादवचा गळा का पकडला, याचा खुलासा अद्यापही झालेला नाही.

    आजोळी घडला हा प्रकार

    हा व्हायरल झालेला व्हिडीओ तेज प्रताप यादव आई-वडिलांबरोबर आजोळी आले होते तेव्हाचा आहे. लालू प्रसाद यादव हे बऱ्याच कालावधीनंतर सासरी आले आहेत. लालू यांच्याबरोबर त्यांची पत्नी तसेच राज्याच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि मुलगा तेज प्रताप यादवही होते. लालू आणि राबडी देवी यांनी घरात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मागून प्रसारमाध्यमांच्या आणि चाहत्यांच्या गर्दीमधून घरात जाताना तेज प्रताप यादव यांनी अचानक संतापून कार्यकर्त्याचा गळा पकडला.
    १४

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    Jalgaon : ट्रॅक्टर पलटीने बाजार समिती परिसर गोंधळात जीवितहानी टळली

    January 30, 2026

    Amalner : जुन्या वादातून तरुणावर भीषण मारहाण

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.