भुसावळातील मुस्लिम नुमाईदा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद

0
19

साईमत/ न्यूज नेटवर्क । भुसावळ ।

शहरासाठी वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यासाठी मुस्लिम नुमाईदा फाउंडेशनचे पालक सलीम शेठ चुडीवाले यांनी जागा, ५० लाख रुपये, इतरांनी विविध स्वरूपात डोनेशन देऊन वृक्षारोपणासह मोफत हॉस्पिटलची निर्मिती करत आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून इतर समाजानेही त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन नगर पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी केले.

येथील मुस्लिम नुमाइदा फाउंडेशनद्वारा खडका रोड भागातील रॉयल पार्क भागातील निर्माण होणाऱ्या मल्टिनॅशनल हॉस्पिटल परिसरात मोठ्या प्रमाणात मोठ्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी मुस्लिम नुमाईदा फाउंडेशनतर्फे शहरातील गरजू लोकांसाठी मोफत मल्टिनॅशनल हॉस्पिटल निर्माण केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

भुसावळ नगरपरिषदेचे ब्रँड अँबेसिडर आणि पर्यावरण नागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नाना पाटील यांनीही शहरासाठी माझे एक झाड प्रत्येकाने लावावे आणि त्याचे संगोपन, संवर्धन करावे. त्यामुळे भविष्यात भुसावळ शहराचे उष्ण तापमान कमी होईल, असे सांगितले.
यावेळी सलीमशेठ चुडीवाले यांनीही मनोगत व्यक्त करताना वृक्ष लागवड होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळेच आज वृक्ष लागवड करत आहोत. यावेळी दवाखाना व रॉयल पार्क परीसरात महेश वाघमोडे, न.पा.चे ब्रँड ॲम्बेसेडर तथा पर्यावरण जागरचे नाना पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती

यावेळी न.पा.चे उपमुख्याधिकारी शेख परवेज अहमद, लोकेश ढाके, नगर अभियंता नंदकिशोर येवतकर, वैभव पवार, मुस्लिम नुमाईदा फाउंडेशनचे पालक सलिमसेठ चुडीवाले, अध्यक्ष फरहान खान, साबीर भाई मनियार, शेख शोएब, अकील खान, हाजी फारूक देशमुख, शेख सलमान यांच्यासह मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here