बायको जिंकली ; चक्क नवऱ्याने कडेवर घेऊन नाचवली

0
23

साईमत लाईव्ह रावेर  प्रतिनिधी 

रावेर तालुक्यात निमड्या या गावात आदिवासी महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत तिचा विजय झाल्याने संपूर्ण कुटुंबासह समर्थकांनी जल्लोष केला बायको ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यामुळे नवऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यामुळे त्याने विजयी झालेल्या बायकोला थेट चारचौघातच कडेवर उचलून घेतले आणि जल्लोष केला. जळगाव जिल्ह्यात घडलेल्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रावेर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काल शांततापूर्ण वातावरणात पार पडला. रावेर तालुक्यात निमड्या या गावात आदिवासी महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत तिचा विजय झाल्याने संपूर्ण कुटुंबासह समर्थकांनी जल्लोष केला. कुटुंबीयांनी महिलेच्या गळ्यात हार घातले. तर नवऱ्याने तहसील आवारातच उत्साहात बायकोला कडेवर घेतले. त्यानंतर खांद्यावर नाचवत नवऱ्याने जल्लोष केला.

आदेश बांदेकर यांच्या ‘होम मिनिस्टर’ शोमध्ये पैठणीच्या खेळात जिंकलेल्या वहिनींना त्यांचे पती उचलून घेतात. त्याप्रमाणेच पतीदेवाने विजयी बायकोला कडेवर घेतल्याने सर्वत्र कौतुक केलं जात होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here