‘भारतमातेच्या’ जयघोषाने पाचोरा नगरी दणाणले

0
72

शिवसेना-उबाठाच्या ‘तिरंगा रॅलीस’ उत्स्फूर्त प्रतिसाद

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. रॅलीला महाराणा प्रताप चौकापासून सुरूवात झाली. रॅलीच्या अग्रभागी वैशालीताई सूर्यवंशी हातात राष्ट्रध्वज घेऊन सहभागी झाल्या. ठिकठिकाणाहून लोक यात्रेत सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय’च्या जोरदार जयघोषात छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरपालिका, देशमुखवाडी, जामनेर रोडमार्गे रॅली काढण्यात आली. भारतमाता पूजन करून राष्ट्रगीताने तिरंगा रॅलीची सांगता करण्यात आली.

रॅलीत उद्धव मराठे, दीपक राजपूत, अरुण पाटील, रमेश बाफना, अनिल सावंत, दीपक पाटील, योजना पाटील, जे.के. पाटील, पुष्पा परदेशी, शंकर मारवाडी, तिलोत्तमा मौर्य, कुंदन पांड्या, सुरेखा वाघ, मनोहर चौधरी, जिजाबाई चव्हाण, माधव जगताप (उपजिल्हाप्रमुख), चेतन पाटील (तालुका प्रमुख युवासेना), चेतन आर. पाटील (शहर प्रमुख युवासेना), यश बिरारी (उपशहर प्रमुख), सुशील महाजन (उपशहर संघटक), डी. डी. पाटील, नरेंद्र राजपूत, उमेश पाटील, नितीन बाविस्कर, सनी पाटील, निलेश सोनवणे, अनिता पाटील, राजेंद्र राणा, दादाभाऊ चौधरी, भरत खंडेलवाल, खंडू सोनवणे,पप्पू जाधव, संजय चौधरी, गजाजन सावंत, राजेंद्र धनगर, नामदेव चौधरी, गफ्फार सैय्यद, वैभव भावसार, नितीन लोहार, प्रवीण मोरे, हेमंत पाटील, हरी पाटील, रवीश सोनवणे, विकास वाघ, बालू अण्णा पिंप्री, संतोष पाटील, भिकन वाघ, अरुण तिघे, ज्ञानेश्वर चौधरी, भैय्या पाटील, प्रितेश जैन, हरीश देवरे, मनोज चौधरी, अनिल सावंत, अभिषेक खंडेलवाल, शशी बोरसे, शिवसेना, युवासेना महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here