असलोदहून ‘गणु’ चित्रपटाच्या शुटींगची सुरुवात ९ तारखेला होणार

0
61

गणेश माळीच्या जीवनावर आधारीत ३५ ते ४० मिनिटांचा असणार चित्रपट

साईमत/असलोद, ता.शहादा/प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील असलोद येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीतील दोन्ही हाताने अपंग असलेला गणेश अनिल माळीच्या जीवनावर आधारीत ३५ ते ४० मिनिटांचा चित्रपटाच्या चित्रीकरणाची शुटींगची सुरुवात असलोद गावातून येणाऱ्या बुधवारी, ९ तारखेला होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक सुनील कुमार देवरे तर चित्रपटाचे निर्माते पंढरीनाथ धनगर आहेत.

चित्रपटातील कलाकार असे आहेत

‘गणु’ चित्रपटात मुख्य कलाकार सुनील कुमार देवरे, ऋतिका कुमारी राजपूत, प्रणाली भावसार, ललिता माळी, गणेश अनिल माळी, अनिल माळी, गणेश सोनवणे, शाम राजपूत, राज कोळी तसेच जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा असलोद येथील बालकलाकार व कनकेश्वरी क्लासेसचे काही विद्यार्थी असे ४५ वरिष्ठ व बाल कलाकार काम करणार आहेत.

या स्थळावर होणार चित्रपटाची शूटींग

‘गणु’ चित्रपटाची सुरुवात असलोद गावात व असलोद गावातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथुन सुरुवात होईल. त्यानंतर कनकेश्वरी क्लासेस येथील परिसरात शुटींग होणार आहे. त्यानंतर निसर्गरम्य वातावरणातील खापरखेडा धरण, त्या परिसरातील पहाडी दृश्य, डोंगरगाव सावखेडामधील वळणावर व काही दृश्य मध्यप्रदेश सिमेलगत पहाडी परिसरात शुटींग होणार आहे.

गणेश माळीची व्यथा, संघर्षमयी जीवन कहानी

गणेश अनिल माळी हा दोन्ही हाताने अपंग आहे. तो पायाने लिहितो, जेवण पायाने करतो, इतर सर्व कामे पायानेच करतो. त्याची आई लहानपणीच त्याला सोडून गेली होती. त्याचे पालनपोषण त्याचे वडील करतात. गेल्यावर्षी गणेश माळी यांची जीवन जगण्याची धडपड व त्याची सर्व जीवन जगण्याची संघर्षमयी व्यथा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी वृत्तपत्रात दिली. सर्व नामांकित वृत्तपत्राने आपल्या पेपरात व युट्यूबवर पहिल्याने प्रसारित केली. ही बातमी प्रचंड व्हायरल झाली.लोकांमध्ये गणेश माळी यांच्याबद्दल आस्था निर्माण झाली. त्यानंतर इतर बऱ्याच वृत्तपत्रातून अपंग गणेश माळीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.त्या बातम्यांची दखल आ.राजेश पाडवी व शहादा तालुक्यातील इतर अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी गणेश माळी यांची भेट घेतली होती. त्याला सर्वेतोपरी मदत केली. एवढेच नाही तर गणेश माळी यांची व्यथा थेट मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी गणेशची परिस्थिती नाजुक असल्याने त्याला मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांचा धनादेश देण्यात आला. तेव्हापासून गणेश हा सर्व महाराष्ट्रात परिचित झाला. त्याच्या जीवनाची व्यथा व जीवन जगण्याची संघर्षमयी कहाणी ही चित्रपट निर्माते पंढरीनाथ धनगर व चित्रपट निर्देशक लेखक सुनील तिरमले यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यावर चित्रपट तयार करणार असल्याचे सांगितले.

आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शन

‘गणु’ चित्रपटाचे काही दिवसांपूर्वी आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शन करण्यात आले. आता प्रत्यक्षात ‘गणु’ चित्रपटाची सुरुवात असलोद गावातून येणाऱ्या ९ ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे. असलोद गावात चित्रपटाची शूटींग होणार असल्याने असलोद गावाचे नाव महाराष्ट्रभर पोहोचणार आहे. गावात शुटींग होणार असल्याने बालकांमध्ये आनंदाचे वातावरण गावात पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here