पाचोऱ्यातील श्री.गो.से.हायस्कुलमध्ये शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल जाहीर

0
8

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कुलमध्ये २०२३ वर्षाचा शासकीय रेखाकला परीक्षा इलेमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कौतुक करुन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष व्ही.टी. जोशी, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन, उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पर्यवेक्षक आर.एल.पाटील, ए.बी.अहिरे, अंजली गोहिल, सांस्कृतिक प्रमुख रहीम तडवी, मनीष बाविस्कर, अजय सिनकर, आकाश वाघ उपस्थित होते.

इलेमेंटरी परीक्षेत ‘अ’ श्रेणीमध्ये २४ विद्यार्थी उत्तीर्ण तर इंटरमिजिएट परीक्षेत ‘अ’ श्रेणीत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नुकत्याच झालेल्या अमृत भारत रेल्वे योजनेअंतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना रेल्वे विभागातर्फे गौरविण्यात आले होते. त्यांचेही कौतुक करुन सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सुनील भिवसने, सुबोध कांतायन, प्रमोद पाटील, ज्योती ठाकरे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन महेश कोडिण्य तर आभार रवींद्र बोरसे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here