Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»पिंप्री खुर्दतून छायाचित्रकाराची दूचाकी लांबविली
    क्राईम

    पिंप्री खुर्दतून छायाचित्रकाराची दूचाकी लांबविली

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील पिंप्री खुर्द गावातून एका छायाचित्रकार (फोटोग्राफर) व्यवसायिकाची दूचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीला आली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर असे की, विजय पंडित पाटील (वय ४१, रा. पिंप्री खुर्द, ता. धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. फोटोग्राफरचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. गेल्या १९ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता विजय पाटील यांनी त्यांची दूचाकी (क्र.एमएच १९ डीएफ ४९८८) ही त्यांच्या घरासमोर पार्किंगला लावलेली होती. दरम्यान सोमवारी, २१ ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजता एक अज्ञात व्यक्ती दूचाकी घेऊन जात असताना गल्लीत राहणारा राहुल पाटील याला दिसला. त्याला पकडण्यासाठी जात असताना अज्ञात दूचाकी घेऊन पसार झाला होता. याप्रकरणी विजय पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. मोती पवार करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष

    February 1, 2026

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.