आठवडे बाजारातील सुलभ शौचालय लोकार्पणाच्या बहुप्रतीक्षेत

0
9

शौचालय तात्काळ सुरु करा : रामराज्य फाउंडेशनतर्फे मागणी

साईमत/फैजपूर/प्रतिनिधी

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून येथील आठवडे बाजारातील सुलभ शौचालय बांधून अद्यापही लोकार्पणाच्या बहुप्रतीक्षेत आहे. त्यामुळे ते तात्काळ सुरु करावे, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन रामराज्य फाउंडेशनतर्फे बुधवारी, १३ नोव्हेंबर रोजी नगरपालिका प्रशासनास देण्यात आले. हे निवेदन मुख्याधिकाऱ्यांच्यावतीने सहायक निरीक्षक संगीता बाक्षे यांनी स्वीकारले.

फैजपूर शहरात एक प्राचीन उत्तम बाजार पेठ आहे. येथील बुधवार रोजी भरणारा आठवडे बाजार पंच क्रोशीतील सर्वात मोठा बाजार आहे. त्यानिमित्त येथे भुसावळ, चोपडा, रावेर, यावल या तालुकासह जिल्ह्याभरातून शेतकरी, व्यापारी, उद्योजक, ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्या दैनंदिन गरजांसाठी येतात. मात्र,येथे नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे नगरपालिका प्रशासनाचे गेल्या दोन ते तीन वर्षात दुर्लक्ष झाले आहे. तसेच याच बाजारात खुलेआम होणाऱ्या मास विक्रीमुळे अनेकांना मोठ्या फजितीला तोंड द्यावे लागत आहे. त्यात विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होऊन त्यांना लज्जित होण्याची वेळ येत आहे. त्याची दखल घेत आता तरी बऱ्याच वर्षांपासून बांधून असलेल्या सुलभ शौचालयाचे तात्काळ लोकार्पण करून हा लाजिरवाणा प्रकार थांबवावा, अन्यथा याविरोधात आंदोलन करण्यात येईल, त्याच्या होणाऱ्या परिणामास दुर्लक्ष करणारे न.पा.प्रशासन राहील, असेही निवेदनात नमूद केले आहे.

पोलिसात गुन्हा नोंदविण्याचा इशारा

सुलभ शौचालयाभोवती सद्यस्थितीला मास विक्रीची खुल्या दुकानाचा गराडा झाला आहे. बाजारातील खुलेआम होणारी मास विक्री बंदिस्त होण्यासाठी आतापर्यंत किमान लाखो रुपयांचा चुराडा करून दोन ते तीन मटण मार्केट अनियोजनाने बांधण्यात आली. त्यास जवाबदार कोण? याकामी या विक्री करणाऱ्या बांधवांना विचारात घेऊन कायम स्वरूपी तोडगा काढण्यात यावा.एकीकडे याकामी केंद्र व राज्य शासन महिलांसाठी कठोर अंमलबजावणी करत असताना मात्र नगरपालिका हे सुलभ शौचालय सुरु करण्यासाठी कोणत्या गैरप्रकाराची वाट बघत आहे, हेच कळत नाही. अशा दुर्लक्ष व वेळ काढूपणा विरोधात पोलिसात गुन्हा का नोंदवू नये, असा गंभीर इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

संबंधितांना निवेदनाच्या प्रती रवाना

निवेदनाच्या प्रती न.पा.प्रशासक प्रांताधिकारी फैजपूर, फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी, यावल तहसीलदार, जळगाव जिल्हाधिकारी यांना माहितीसाठी रवाना केल्याची माहिती रामराज्य फाउंडेशनने दिली आहे.यावेळी रामराज्य फाउंडेशनच्या मृणालिनी राणे, भारती पाटील, अतुल महाजन, निलेश चौधरी, हरिचंद्र वाघुळदे, संजय सराफ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here