Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»धुळे»The Increase In Fees : प्रमाणपत्रे, दाखल्यांच्या शुल्कातील झालेली वाढ कमी करावी
    धुळे

    The Increase In Fees : प्रमाणपत्रे, दाखल्यांच्या शुल्कातील झालेली वाढ कमी करावी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 20, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांची मागणी

    साईमत/शिरपूर/प्रतिनिधी :

    ‘आपले सरकार’ सेवा केंद्रातून मिळणाऱ्या विविध प्रमाणपत्रांच्या शुल्कात दुपटीने वाढ करण्यात केली आहे. जात आणि नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी आता १२८ रुपये मोजावे लागत आहेत. ही दरवाढ शैक्षणिक वर्ष सुरुवात होत असतानाच लागू झाल्याने विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. धुळे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी मुंबईला मंत्रालयात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची नुकतीच भेट घेऊन प्रमाणपत्रे, दाखल्यांच्या शुल्कात झालेली वाढ कमी करावी, अशा आशयाची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

    निवेदनात नमूद केले आहे की, आता शाळा, काॅलेज, महाविद्यालय सुरू झाली आहेत. जात, उत्पन्न, नॉन क्रीमिलेअर, नॅशनलिटी, रहिवासी अशा विविध प्रमाणपत्रांची विद्यार्थ्यांना आवश्यकता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची सेवा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यातच प्रमाणपत्रांच्या शुल्कात अचानक मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. यापूर्वी एका प्रमाणपत्रासाठी साधारण ३३.६० ते ५७.२० रुपये एवढे शुल्क होते. मात्र, एप्रिलपासून नव्या दरांची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

    दरवाढ कमी करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा

    शाळा, काॅलेज, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना जात, उत्पन्न, नॉन क्रीमिलेअर, नॅशनॅलिटी, रहिवासी अशा विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. मात्र, सर्व प्रमाणपत्रांच्या शुल्कातील दरवाढीमुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये नाराजी आहे. प्रमाणपत्राची झालेली दरवाढ कमी करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अरुण धोबी यांनी महसूल मंत्र्यांजवळ करुन याविषयी सविस्तर चर्चा केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dhule : धुळ्यातील पिंपळनेर हादरले; आनंदोत्सवात धारदार शस्त्रांचा कहर

    February 20, 2026

    Taloda:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तळोदा महाविद्यालयात अभिवादन

    January 3, 2026

    Navapur:“नवापूर नगराध्यक्षांचे दालन नागरिकांसाठी सदैव खुले; नवापूरमध्ये लोकशाही संवादाला नवे बळ”

    January 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.