‘हरियाली तीज सिंजारा’ उत्सव उत्साहात साजरा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे हरियाली तीज सिंजारा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त रंगीबेरंगी रांगोळ्या, झुले, आकर्षक सजावट व सेल्फी पॉईंटने वातावरण सजले होते. सदाबहार नृत्य, अंताक्षरीच्या खेळात नवीन प्रकार राउंड घेतले. जसे की गुण मिळवायचे असेल तर बोल बोली बोल, गाणी ओळखा, गिबली फोटोग्राफी, रिल्स बनवा, टीव्ही सिरीयलशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले.अशी आगळी-वेगळी अंताक्षरीच्या स्पर्धेने कार्यक्रम रंगला. संगीताच्या अशा खेळामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते.
स्पर्धेत ६ गटांनी सहभाग घेतला. त्यात बांसुरी गट प्रथम तर पियानो गट द्वितीय क्रमांकावर राहिला. नव्या-जुन्या पिढीचे सुंदर तालमेल हे सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट चेअरमन सुरभी झंवर, श्रद्धा मंडोरे, रेखा जाजू, मधू तापडिया, गीता जाखोटिया, कंचन काबरा, सुषमा राठी, विद्या तोतला, वैशाली मंडोरा, रेखा लाहोटी, ज्योती झंवर, दर्शना जाखोटिया आदी सखींनी परिश्रम घेतले.