घोसल्यात धडकले श्वान पथक, एका शेतातून दुसऱ्या शेतातच फिरले चोरटे

0
34

श्वानाच्या मागोव्यात झाले स्पष्ट

साईमत/सोयगाव /प्रतिनिधी

तालुक्यातील घोसला शिवारात झालेल्या जबरी चोरीचा छडा लावण्यासाठी सोमवारी दुपारी छत्रपती संभाजीनगरचे श्वान पथक दाखल झाले. त्यामध्ये श्वान ‘जुलिया’ने घटनास्थळी चोरट्यांचा माग घेतला असता चोरटे एका शेतातून दुसऱ्या शेतातच शेडजवळ घुटमळत असल्याचे श्वान ‘जुलिया’ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संशयित चोरटे हे परिसरातीलच असल्याचा अंदाज पोलिसांना आला आहे. त्या दृष्टीने तपास सुरू झाला आहे.

सोयगाव तालुक्यातील घोसला शेती शिवारात अनिल भिका बोरसे, ज्ञानेश्वर गवळी आणि सुभाष हरणे यांच्या शेतातील शेडमधील कुलुप तोडून एक लाख ३१ हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे. सोमवारी, २६ ऑगस्ट रोजी दुपारी छत्रपती संभाजीनगरचे श्वान पथक घोसला शिवारात दाखल झाले होते. यावेळी श्वानाने चोरट्यांचा घटनास्थळी माग घेतला. परंतु अज्ञात चोरटे हे शेतातच फिरले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

घटनास्थळाचे घेतले ठसे

पथकात अंमलदार श्रीकांत जोग, अंमलदार रोहित झिंजुर्डे, हवालदार करळकर आदींनी शोध घेवून घटनास्थळाचे ठसे घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, उपनिरीक्षक रजाक शेख, जमादार राजू बर्डे, रवींद्र तायडे, संदीप सुसर, अजय कोळी आदी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here