साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घेतला आहे. त्यात दुचाकी चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे वाहनधारक धास्तावले आहेत. दरम्यान, 19 लाख 58 हजार 139 रुपये किमतीच्या 26 मोटारसायकलींसह चोरट्याला जळगावच्या (Jalgaon) स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ताब्यात घेतलं आहे.
भडगाव (Bhadgaon) येथील एका साई अँटो बजाज शोरुममधील तब्बल 30 नव्या मोटारसायकली चोरीस गेल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे गेला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी संबंधित शोरूमच्या मालकास स्टॉकबाबत विचारपुस केली असता त्यांनी त्यांच्या स्टॉकमधून 14 पल्सर मोटारसायकली व 16 प्लॅटीना मोटारसायकली अशा एकूण 30 मोटारसायकली 22 लाख 77 हजार 980 रुपये किंमतीच्या कमी असल्याचे सांगितले.
यानंतर पथकाने स्टॉकमधील कर्मचाऱ्यांना विचारपुस करून संशयीत शोएब खान रऊफ खान, रा.नगरदेवळा (ता.पाचोरा) (Pachora) यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने शोरुममधून साधारण तीन महिन्यांपासून वेळोवेळी जशी संधी मिळेल तशी1-1 मोटारसायकल बाहेर काढून इतरांना कमी पैशांत विकत होता.
त्याला विश्वासात घेवून त्याने ज्या व्यक्तींना विकलेल्या आहेत अश्ाा व्यक्तींना निष्पन्न करीत आहोत. त्यांच्याकडून 11 पल्सर मोटारसायकली व 15 प्लॅटीना मोटारसायकली अशा 26 मोटारसायकली 19 लाख 58 हजार 139 रुपये किंमतीच्या मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तसेच सदर गुन्ह्याच्या पुढील तपासकामी भडगाव पोलीस स्टेशन गुरनं 171/ 2023 भादंवि कलम 380 या गुन्ह्यात आरोपी व मो.सा. हे पुढील तपास कामी देण्यात आले आहे.