Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»ग्रामीण भागातील शिक्षक-विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना मिळतेय दाद
    जामनेर

    ग्रामीण भागातील शिक्षक-विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना मिळतेय दाद

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 26, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जामनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील पळासखेडा मिराचे येथील नि.पं.पाटील विद्यालयतर्फे गणेशोत्सवनिमित्त विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच उत्साहात झाले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी मेहनतीने तयार केलेल्या कल्पक कलाकृतींना नागरिकांकडून दाद मिळत आहे. हे प्रदर्शन ३० सप्टेंबरपर्यंत रिंग रस्त्यावरील गाडगीळ चित्रप्रदर्शनीत सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील विद्यालयातर्फे केले आहे.

    जळगाव अजिंठा आर्ट सोसायटी, व नि.पं.पाटील विद्यालय, पळासखेडे (मि.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शनाचे उद्घााटन दि शेंदुर्णी संस्थेचे सचिव सतिष काशिद यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड होते. याप्रसंगी संदीप पोतदार, शाळेचे मुख्याध्यापक बी.एस.निकम, पर्यवेक्षक व्ही.आर.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

    ३० सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार प्रदर्शन

    कलेची जोपासना आणि कलेत करिअर करा. तसेच ग्रामीण भागातील चित्रकला प्रदर्शन बघुन सतिष काशिद यांनी कौतुक केले. तसेच संजय गरुड यांनी चित्रकलेत विविध शैलीतील चित्राचे कौतुक करुन कलेची जोपासना करावी, असे सांगितले. चित्रप्रदर्शनात पेन्सील माध्यमाचे गणपतीचे आकर्षक ड्रॉईंग व पेंटींग, पोस्टर कलर माध्यमाचे पेंटींग तसेच निसर्गचित्र, वारली पेंटींग अशा विविध माध्यमाची व शैलीची ६० चित्रे आहेत. चित्रकला प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य असून शनिवारी, ३० सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु असणार आहे.

    प्रदर्शनीत यांच्या चित्रांचा आहे समावेश

    प्रदर्शनीत मिताली काळे, गायत्री भुरे, पूनम सूर्यवंशी, ईश्वर चौधरी, प्रतिक्षा पाटील, जयश्री घोडके, रीतु पाटील, रेणू पवार, जान्हवी हडप, जयश्री पिठोडे, जान्हवी खैरे, योजना चौधरी यांच्यासह माजी विद्यार्थ्यांचे चित्रे आहेत. विद्यार्थ्यांना शिवप्रसाद जोशी, डी.आर.चौधरी यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन टी.टी.इंगळे तर मनिष पाटील यांनी आभार मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : जळगाव जिल्ह्यात आठ नवीन ग्रामपंचायतींना शासनाची मान्यता

    April 7, 2026

    Jamner : फत्तेपूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मका शेत जळून खाक

    April 6, 2026

    Jamner : जुन्या वादातून महिलेवर विनयभंग; दोन भावंडांविरोधात गुन्हा

    April 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.