साईमत जळगाव प्रतिनिधी
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विजया केसरी प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘मंदिर आमची बद्धा स्वच्छता आमचा ध्यास’ या अभियानात प्रसिद्ध वक्ते राहुल सोलापूरकर यांची जिल्ह्यातील चार तालुक्यात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उद्योजक अविनाश पाटील-जाधव यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
विजया केसरी प्रतिष्ठानतर्फे सामाजिक क्षेत्रात विविध कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील विविध भागात हे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने, प्रसिद्ध वक्ते राहुल सोलापूरकर यांची व्याख्याने, शिबिर असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘मंदिर आमची श्रद्धा… स्वच्छता आमचा ध्यास… है अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत विविध ठिकाणची मंदिरे व परिसर स्वच्छ केला जाणार आहे.
प्रसिद्ध व्याख्याते राहूल सोलापूरकर यांचे १९ रोजी चाळीसगाव येथील तेली समाज मंदिर कार्यालय येथे सायंकाळी ७ वाजता ‘शिवरायांचे व्यवस्थापन व व्यापार शास्त्र या विषयावर, २० फेब्रुवारी रोजी पाचोरा येथील स्वामी लॉन येथे सायंकाळी ७ वाजता ‘प्रताप गडाचे मंत्र युद्ध’ या विषयावर, २९ फेब्रुवारी रोजी जळगाव येथे सायंकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी महाराज हॉल, मायादेवी नगर येथे ‘श्रीराम मंदिर अयोध्या, इतिहास राह मंदिराचा’ या विषयावर तर २३ रोजी अमळनेर येपाल छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे ‘श्रीराम मंदिर अयोध्या, इतिहास राष्ट्र मंदिराचा’ या विषयावर सायंकाळी ६ वाजता व्याख्यान होईल.
यासह ११ रोजी पारोळा येथील मोठा महादेव चौकात सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. प्रसिद्ध खंजिरी वादक रामपाल महाराज यांचे सामाजिक जागृतीपर कीर्तन होईल, तसेच १२ रोजी सायगाव ता. चाळीसगाव येथील श्रीराम मंगल कार्यालय परिसरात सायंकाळी ७ वाजता, २६ रोजी कजगाव येथे तर २७ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरातील मेहरूण परिसरात कीर्तन होईल, यासह धरणगाव येथे १८ रोजी तर २५ रोजी जळगाव येथे मेहरूण परिसरात आरोग्य शिबीर होणार आहे.