In Forest Department ; यावल वनविभागात ५१ हजार रुपयाचे सागाचे चौपाट जप्त

0
16

कारवाई संशयास्पद? ; सागवान लाकूड तस्कर फरार झाले की केले?, नागरिकांमध्ये चर्चा

साईमत/यावल/प्रतिनिधी : 

यावल वनविभाग गस्ती पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शुक्रवार दि.३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री यावल पूर्व आणि पश्चिम कार्यालयापासून १० कि.मी.अंतराच्या आत असलेल्या कोरपावली गावाजवळ सापळा रचून सागवान लाकूड तस्करांवर कारवाई करण्यात आली.५१ हजार २०० रुपयाच्या साग चौपाटासह मोटरसायकली जप्तची कारवाई करण्यात आली. त्यातील २ आरोपी फरार झाले की फरार करण्यात आले? याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे. ही कारवाई ३ रोजी रात्री १२.४५ वाजेच्या सुमारास करण्यात आली.

याबाबत सातपुड्यातील तथा वनक्षेत्रातील सागवान व आडजात लाकूड व्यवसाय करणाऱ्यांमध्ये व वनविभागातील काही मोजक्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये केलेल्या कारवाईबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, यावल वनपरिक्षेत्र अधिकारी, गस्ती पथक यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार गस्ती पथकाने मोटरसायकलवरून गस्त करत कोरपावली गावाजवळ २ अज्ञात इसम सागवान लाकूड घेऊन मोटरसायकलवरून जाताना दिसले. गस्ती पथकाने त्यांचा पाठलाग केला असता आरोपींनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळीच दोन्ही मोटरसायकली व लाकूड फेकून पळ काढला.

या कारवाईत दोन मोटरसायकली ( प्रत्येकी अंदाजे किंमत २० हजार व सागवान कट साईज चौपाट नग २०, घनमीटर ०.३२०, किंमत रुपये ११ हजार २०० असा एकूण ५१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. हा मुद्देमाल शासकीय वाहनाद्वारे यावल येथील मुख्य विक्री केंद्रात जमा करण्यात आला आहे. याप्रकरणी यावल गस्ती पथकाने गुन्हा क्र.११/२०२६ दि.३ ऑक्टोबर अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई जळगाव येथील यावल वन विभाग उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली केली असली तरी यावल पूर्व व पश्चिम वनविभागात आणि यावल, रावेर तालुक्यातील सातपुडा डोंगरात सागवान व आडजात लाकडाची तस्करी सर्रासपणे सुरू आहे. यात यावल-रावेर तालुक्यातील काही आरागिरणी चालक अनेक फर्निचर दुकानदार आणि मिस्तरी यांच्याकडून हप्ते गोळा करून काही वन अधिकाऱ्यांना देत असल्याची चर्चा असल्याने सागवान लाकूड जप्त करण्याची कारवाई दोन-तीन महिन्यातून एक वेळा होत असते.

कारवाई सुरू असल्याचे दाखवून कारवाईचा कांगावा केला जात आहे. दररोज अवैध सागवान लाकडाची वाहतूक वनविभागाला दिसत नाही का? असा प्रश्न यावल, रावेर तालुक्यात सागवानी लाकडाचा काही अधिकृत आणि बेकायदा व्यवहार करणाऱ्यांसह वन विभागातील काही हप्ते न घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये बोलले जात आहे.यावल पूर्व-पश्चिम वनक्षेत्रपाल यांना प्रसिद्धी माध्यमांची एलर्जी यावल पूर्व आणि पश्चिम वनविभाग म्हणजे यावल, रावेर, चोपडा असा संयुक्त वनविभाग जळगाव येथील यावल वनविभाग उपवन संरक्षक यांच्या कार्यक्षेत्रात आहे. परंतु यातील अधिकारी हे अवैध सागवानी लाकूड तस्करांवर केलेल्या कारवाईची माहिती प्रसिद्धी माध्यमांना एकाच वेळेला देत नसल्याने त्यांच्या कामकाजाविषयी सुद्धा संशय व्यक्त करण्यात येत असून.

याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच वन विभाग मंत्री,मुख्य सचिव यांनी आपले लक्ष केंद्रित करून यावल विभागाच्या भोंगळ कारभाराविषयी विभागीय चौकशी करावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here