साईमत, जामनेर : प्रतिनिधी
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या शिक्षकांसाठी ‘शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण शिबिर-२०२४’ २६ ते २८ फेब्रुवारी २०२४ यादरम्यान रोज सकाळी १० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत जामनेरातील इंदिराबाई ललवाणी विद्यालयात शिबिराला प्रारंभ झाला आहे.
शिबिराच्या दुसऱ्या टप्प्यात जामनेर न्यू इंग्लिश स्कुलचे व्ही.डी.पाटील, आर.डी.येवले, पी.एम.पाटील, ललित लामखेडे, के.एस.शर्मा, एस. ए.सुरवाडे, एस.एस.शिरसाट, एस.एस.जंजाळ, एस.एस.भोंडे, एस.डी.पेडगावकर, एन. यू.बढे, पी.एम.पांढरे, व्ही.ए.पाटील, जी. आर. धांडे, के. व्ही.पाटील, आर.एस.ठाकूर, आर.बी.पाटील, ए.आर. टहाकळे, सौ.डी.बी.इंगळे, डी.वाय.बडगुजर, जी.एफ.पाटील आदी शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
प्रशिक्षणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षकांची बदलती भूमिका, विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची नवीन तंत्रे यावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण इयत्ता नववी ते बारावीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी आयोजित केले आहे.