महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करा

0
73

पाचोरा परिसरातील पालकांतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

सध्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असल्याची समस्या समाजात भेडसावत आहे. त्यामुळे महिलांसह मुलींवरील अत्याचार थांबविण्यासाठी अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशा आशयाचे निवेदन पाचोरा परिसरातील पालकांतर्फे प्रांताधिकारी भूषण अहिरे यांना नुकतेच देण्यात आले. याप्रसंगी महिला, पालक वर्ग उपस्थित होते.

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मागील काही दिवसात अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत आहे. अशा घटनांचा लहान मुलांच्या बालमनावर दीर्घकालीन परिणाम होतो. त्यामुळे मुले डिप्रेशनसारख्या मानसिक आजाराने ग्रस्त होतात. त्यांच्या पूर्ण आयुष्याचे नुकसान होते. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी आपल्याकडे विविध कायदे अस्तित्वात आहेत. पण त्यांची कठोर अंमलबजावणी होत नसल्याने गुन्हेगार अशा प्रकारचे गुन्हे करायला धजावत आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक संस्था मिळुन समन्वय समिती गठित करावी. शाळा व पालक यांचा समन्वय साधून भावी पिढीला अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून वाचवू शकतो. तसेच शाळांमध्ये वि‌द्यार्थ्यांना यासंदर्भात प्रबोधन होण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

पालक सभेमध्ये अशा प्रकरणांवर चर्चा होऊन काहीतरी चांगला मार्ग निघावा. त्यासाठी इंग्लिश माध्यमासोबत मराठी माध्यमाच्या शाळांमध्येही अशा प्रकारच्या सभा होऊन त्याचा आढावा आपण घ्यावा. त्यामुळे असे प्रकार आपण आपल्या स्थानिक पातळीवर टाळू शकू. निवेदनाची दखल घ्यावी, अशीही मागणी निवेदनात नमूद आहे.

यांची होती उपस्थिती

यावेळी अभिलाष बोरकर, गोकुळ सोनार, दीपक माने, शरद मिस्तरी, दत्ता सोनार, अमोल ठाकूर, प्रवीण चौधरी, गणेश पांडे, सुनैना बोरकर, पल्लवी माने, निशा पांडे, दीपाली सोनार, राधिका सोनार, सलोनी कुकरेजा, प्रतिभा पाटील, आशा पाटील, सुषमा ठाकूर, अश्विनी मार्कंड्ये, मनोज सोनार, प्रमोद नावरकर, प्रदीप सिसोदिया, प्रशांत येवले, दत्तात्रय सोनार, रामचंद्र कुकरेजा, तुळशीदास पटेल, विनोद मार्कंड्ये, बापू पाटील, फिरोज देशमुख, भावेश पाटील, दिनेश पाटील, समाधान महाजन, प्रवीण मोरे, सचिन पाटील, योगेश जागीरदार, संदीप पाटील, दिनेश पाटील आदी सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here