यावल : प्रतिनिधी
यावल तालुक्यातील आमोदा येथे पशुधन पर्यवेक्षक हे कार्यालयीन वेळेत हजर राहत नसल्याने तसेच जळगाव येथून 50 किलोमीटर अंतरावरून अपडाऊन करीत असल्याने मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याने त्यांच्या कार्यक्षेत्रातील म्हणजे आमोदा,बामणोद, म्हैसवाडी,विरोदा परिसरातील एकूण 23 हजार पशुधनाची देखभाल औषधोपचार वेळेवर होत नसल्याने पशु पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.पशुधन पर्यवेक्षक हे पशुपालकांना आणि शेतकऱ्यांना आपल्या पशुंबाबत पाळीव प्राण्यां बाबत योग्य तो सल्ला आणि मार्गदर्शन,औषधोपचार नेमका कोणत्या दिवशी व कुठे करतात? याबाबत सुद्धा अनेक प्रश्न आमोदा परिसरात उपस्थित केले जात आहेत,पशुवैद्यकीय दवाखान्यातील कंपाउंडर पशुपालकांना आश्वासन देत असतो की पशुधन पर्यवेक्षक येत आहेत ते या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आहेत असे सांगून संबंधित पशुपालकांचे समाधान आणि टाइमपास करून घेत असतात याकडे मात्र जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामीण भागातून होत आहे.
गेल्या 10 दिवसापूर्वी आमोदा येथील पशुवैद्यकीय दवाखाना बंद असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते आणि आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक गेल्या दहा दिवसापासून उपस्थित नसल्याचे त्या ग्रामीण भागात बोलले जात आहे दवाखान्यातील संबंधित कंपाउंडरला आमोदा बामणोद म्हैसवाडी विरोदा परिसरातील अंदाजे 23 हजार पशुधन पालकांकडून सतत विचारणा होत असते तसेच संबंधितांना आपल्या पशु पक्षी प्राण्यांवर औषधोपचार करण्यासाठी वेळेवर पशुधन पर्यवेक्षक उपलब्ध होत नसल्याने पाळीव प्राण्यांवर औषधोपचार करणे आणि मार्गदर्शन मिळणे अशक्य झाले आहे, जिल्हास्तरावरून मुक्या प्राण्यांना आलेल्या औषधीचे वितरण नेमके कोणत्या वेळेस कोण करत असते इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून पशुधन पर्यवेक्षक हे जळगाव येथून 50 किलोमीटर अंतरावर ये जा करीत असल्याने त्यांच्या कार्यक्षमते बाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आमोदा पशुधन पर्यवेक्षक यांच्या कार्यक्षेत्रात आमोदा, बामणोद,म्हैसवाडी,विरोदा इत्यादी ग्रामीण भाग येत असल्याने त्यांच्या कार्यक्षेत्रात एकूण 23 हजार पशुपक्षी,शेळ्या, मेंढ्या इत्यादी पाळीव प्राणी आहेत या सर्वांचे पालन करणाऱ्यांची मोठी भटकंती होत असून आणि वारंवार दूरध्वनीवरून संपर्क साधावा लागतो त्यांना संबंधितांकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जातात याकडे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून आमोदा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची सखोल चौकशी करून गुरे–ढोरांना पाळीव प्राण्यांना कागदोपत्री उपचार केले जातात का? इत्यादी चौकशी करून पुढील कार्यवाही करावी अशी मागणी संपूर्ण यावल तालुक्यातून होत आहे.आमोदा पशुवैद्यकीय दवाखान्यात पूर्ण वेळ देणारे पशुधन पर्यवेक्षक का नियुक्त केले जात नाहीत?हा कायदेशीर प्रश्न उपस्थित होत आहे.