Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»आजाराला कंटाळून तरूणाची आत्महत्त्या
    क्राईम

    आजाराला कंटाळून तरूणाची आत्महत्त्या

    SaimatBy SaimatAugust 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत यावल प्रतिनिधी

    यावल तालुक्यातील मोहराळा येथील ३३ वर्षीय तरूणाने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी यावल पोलीसस्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उत्तम भोजु उर्फ छोटु पाटील (वय-३३) रा. मोहराळा ता.यावल असे मृत तरूणाचे नाव आहे.

    याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील मोहराळा येथे उत्तम भोजु उर्फ छोटु पाटील हा आपल्या आई व भावासह वास्तव्याला होता. तो एका दुर्धर आजाराने ग्रस्त होता. रविवारी १३ ऑगस्ट रोजी त्याची आई शेतात कामाला गेली होती. त्यावेळी तो घरी एकटाच होता. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपविली.

     

    दुपारी त्याची आई घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आल्याने तिने एकाच हंबरडा फोडला. दरम्यान, मयत भोजु पाटील यास यावल येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्यास मयत घोषीत केले. मयताचे भाऊ यशवंत पाटील राहणार यावल यांनी खबर दिल्यावरून यावल पोलीस स्थानकात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.