साईमत, जळगाव : प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील वाकोद येथील राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयातील १४ वर्ष वयोगटातील विभागीय कुस्ती स्पर्धेत मुलांमध्ये आनंद गोपाल सोनेत हा ४४ वजन गटातून प्रथम क्रमांक पटकावून विजयी झाला. या यशामुळे आनंद सोनेतची राज्यस्तरावर निवड केली आहे.
येवला येथील भाऊलाल लोणारी क्रीडा संकुल येथे २० रोजी झालेल्या नाशिक विभागात जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यातून स्पर्धक आले होते. आनंद सोनेत याने तीन राऊंडमध्ये सहा स्पर्धकांना चित करत विजय मिळविला. या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह दि शेंदुर्णी एज्युकेशन को.ऑप सोसायटी लिमिटेड, शेंदुर्णी संस्थेचे चेअरमन संजय गरूड, सचिव सतिश काशीद, सहसचिव दीपकराव गरूड, ज्येष्ठ संचालिका उज्ज्वला काशीद, वसतिगृह सचिव कैलासराव देशमुख, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, विजयी खेळाडूंचे पालक गोपाल सोनेत तसेच शाळेचे मुख्याध्यापक आर. एस. चौधरी, क्रीडा शिक्षक के. एम. पाटील, ए. ए. पाटील, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून विजयी खेळाडूंचे कौतुक केले आहे.