जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता
साईमत/अमळनेर/जळगाव//प्रतिनिधी :
अमळनेर तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंत्यास चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई नंदुरबार आणि जळगाव विभागाच्या लाचलुचपत विभागाने बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास केली.
दिलीप पाटील असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप पाटील यांच्याकडे धरणगाव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा देखील पदभार होता. तेथील एका प्रकरणात मंजुरीसाठी दिलीप पाटील याने चार हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीनंतर एलसीबीने सापळा रचत अभियंता दिलीप पाटील याला तक्रारदाराकडून लाच स्विकारताना रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.