Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»पाहिजेत स्टंटबाज, लाचार, कपटी उमेदवार!
    राजकीय

    पाहिजेत स्टंटबाज, लाचार, कपटी उमेदवार!

    saimatBy saimatSeptember 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर :

    राज्य सरकारच्या तिजोरीवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी विविध शासकीय कार्यालयातील कामे बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून करून घेण्याचा आणि त्यासाठी अनेक कामांचे (आऊटसोर्सिग) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्यभरातून या निर्णयाला विरोध होत आहे. यामुळे संतापलेल्या नेटकऱ्यांनी आता थेट कंत्राटी पद्धतीने आमदार भरतीची जाहिरात काढली आहे. हा विषय सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

    एकीकडे मेगाभरती निघाल्याचा आनंद होत असतानाच दुसरीकडे मात्र सरकारने यापुढे शासकीय नोकर भरती कंत्राटी पद्धतीने केली जाईल आणि याकरिता नऊ कंपन्यांना कंत्राट देण्यात आले असल्याची घोषणा केली आहे.

    नेटकऱ्यांकडून आमदार भरतीसाठी विविध अटी आणि शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. खोके घ्यायची क्षमता असावी, सुरत गुवाहाटी प्रवासाची क्षमता असावी, निष्ठा क्षणाक्षणाला बदलण्याची हिंमत असावी, यांसह काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. तर स्टंटबाज, लाचार, कपटी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल अशी टीप आहे.

    यापुढे शासकीय नोकरी केवळ कंत्राटी पद्धतीने होईल. हा निर्णय तरुणांच्या स्वप्नाचा चुराडा करणार असल्याने राज्यभर या निर्णयाचा विरोध होत आहे. आता नेटकऱ्यांनी समाजमाध्यमांतून कंत्राटी आमदार भरती काढत रोष व्यक्त केला आहे. शासकीय नोकरी संपविण्याचा हा सरकारचा डाव आहे. यामुळे येणाऱ्या काळात तरुणाईची अवस्था अतिशय बिकट होणार आहे.
    ६

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Devendra Fadnavis : लॉकडाऊनची अफवा पसरवणाऱ्यांनो खबरदार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

    March 27, 2026

    SC Holiday Verdict : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय: धार्मिक सणासाठी सार्वजनिक सुट्टीची मागणी करता येणार नाही

    March 26, 2026

    Narendra Modi On War : पश्चिम आशियातील युद्धावर भारताची संतुलित भूमिका; लोकसभेत पंतप्रधान मोदींचे स्पष्ट विधान

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.