साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीद्वारा संचलित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयात ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात आला. यादिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून तासिका घेऊन दिवसभराचे कामकाज पाहिले. अध्यक्षस्थानी संस्थेचेे ज्येष्ठ संचालक भीमराव शेळक होते. विद्यार्थी शिक्षकांनी शिक्षकांच्या भूमिका बजावल्यामुळे विद्यार्थी शिक्षकांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी माजी मुख्याध्यापक ए.ए. पटेल, सामाजिक कार्यकर्ते अण्णा बेलदार, माजी उपसरपंच आबा चौधरी, गोपाळ पांढरे, गणेश कोळी, ‘माणुसकी समूहा’चे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार गजानन क्षिरसागर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण आणि डॉ.जे.जी.पंडित यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. संस्थेच्यावतीने शिक्षकांचा रुमाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ.जे.जी.पंडित यांच्या कार्याविषयी माहिती मनोगतातून व्यक्त केली. विद्यार्थी शिक्षकांनी दिवसभरात कशा पद्धतीने शिक्षकांना कामकाज करावे लागते. त्यांना आलेले अनुभव सांगितले. मान्यवरांमधून गजानन क्षिरसागर, ए.ए. पटेल तर शिक्षकांमधून विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक विद्यार्थी शिक्षिका प्रांजल पालीवाल, सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका नम्रता चौधरी, चंचल चौधरी हिने तर आभार प्रांजल पालीवाल हिने मानले.