साईमत/ न्यूज नेटवर्क/फैजपूर :
विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात प्रयत्नांची पराकाष्ठा करून उज्ज्वल यश संपादन करावे. विविध सुसंस्कारांनी आपले व्यक्तिमत्व आदर्श बनवावे. आत्मनिर्भर होणाऱ्या भारत देशात या माध्यमातून युवकांनी देश मजबूत करावा. भविष्यात भारत देश हा विश्वगुरू होणार असून यासाठी युवकांचा सहभाग महत्त्वाचा असणार असल्याचे प्रतिपादन यावल शेतकरी संघाचे सभापती नरेंद्र नारखेडे यांनी केले. शहरातील श्री लक्ष्मी नागरी पतसंस्थेकडून सामाजिक उपक्रमांतर्गत म्युनिसिपल हायस्कुलमधील गरजू, निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते अध्यक्षीय मनोगतात बोलत होते. शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर-वह्या, शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.जी. पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मी नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन मनोजकुमार पाटील, संचालक अनिल नारखेडे, अप्पा चौधरी, सुरेश परदेशी, विजय परदेशी, खेमचंद नेहेते, निळकंठ सराफ, भास्कर बोंडे, मुख्याध्यापक के.टी.तळेले, पर्यवेक्षक संजय सराफ, ए.के.महाजन, एस.एल.धांडे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे व्यवस्थापक जयश्री चौधरी, राजेंद्र मानेकर, राजेंद्र मिस्तरी, मनोज वायकोळे, म्युनिसिपल हायस्कुलचे शिक्षक, कर्मचाऱ्यांंनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांचे शिक्षक हे प्रेरणास्थान आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे बाळकडू घ्यावे. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याच्या विविध पद्धती प्राचार्य डॉ.के.जी.पाटील यांनी सविस्तर सांगितल्या.
उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार
गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जोपासत श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेकडून दरवर्षी फैजपूर परिसरात हा शालेय उपक्रम गरजू, निराधार विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. यापुढे उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येईल, अशी माहिती श्री लक्ष्मी नागरी पतसंस्थेचे चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी दिली.
