लळिंग घाटात चार वाहनांचा विचित्र अपघात

0
10

साईमत, धुळे : प्रतिनिधी

शहराजवळील मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात मंगळवारी चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. अपघातग्रस्त वाहनांमध्ये गॅस टँकरचाही समावेश आहे. टँकरला गळती लागली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कंटेनर आणि मालमोटार या दोन वाहनांचा अपघात झाल्याने घाटात वाहतूक खोळंबली असताना उभ्या गॅस टँकरला मागून दुसरे वाहन येऊन धडकले. त्यात इतर काही वाहनांचेही नुकसान झाले. पोलीस प्रशासनातर्फे खबरदारीची उपाययोजना म्हणून अग्निशमन दलास तसेच आपत्कालीन विभागाला बोलविण्यात आले. अपघातात एक चालक जखमी झाला आहे. त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here