जामनेर तालुक्याला वादळाचा बसला तडाखा

0
19

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यामध्ये शनिवारी, २५ मे रोजी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या चक्रीवादळ व पावसामुळे फत्तेपूर देऊळगाव कापूसवाडी पळासखेडा यांच्यासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये चक्रीवादळ झाले. यामुळे मोठ्या प्रमाणावर घराचे गोठ्याचे नुकसान झाले आहे.सायंकाळपासून तालुक्यातील विविध गावांना वादळाचा फटका बसला. त्यात उडालेल्या पत्रामुळे जनावरे मोठ्या प्रमाणावर गंभीर जखमी झाले आहेत. त्याचबरोबर शेती पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतीचे घराचे व जनावरे जखमी झालेल्या व दगावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान, जामनेर तालुक्यातील वादळामुळे नुकसान झालेल्या भागाची राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करुन तात्काळ पंचनामे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर नुकसान झालेल्या सर्व नागरिक व शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले आहे.

तालुक्यात घरांची पडझड

मतदारसंघातील देऊळगाव, तोरनाळा, पळासखेडा काकर, गोरनाळा येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, राहत्या घरांचे व पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष भेट देऊन मंत्री ना.गिरीष महाजन यांनी पाहणी केली. केळीच्या बागा अक्षरशः झोपल्या आहेत. अनेक ठिकाणी घरांची छते उडून गेली असून घरांची पडझड झाली आहे.

शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे तसेच घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावेत, यात एकही बाधित शेतकरी सुटता कामा नये, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here