साईमत, फैजपूर, ता.यावल : प्रतिनिधी
आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष मुस्तफा (राजु) बिऱ्हाम तडवी यांच्या नेतृत्वाखाली फैजपूरचे उपविभागीय अधिकारी उपजिल्हाधिकारी फैजपूर विभाग यांना आसेमं (आदिवासी सेवा मंडळ) आणि आदिवासी तडवी भील समाज बांधवांनी विविध विषयांवर भेट घेऊन निवेदन सादर केले. शासनाचे लक्ष वेधून अडचणी सोडविण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बांधवांना वस्तू, संस्कृती जतन, संवर्धन, प्रदर्शन, चालीरिती रिवाज अविरत अबाधित व संस्कृतीचे संवर्धनासाठी पुणे टीआरटीआय आदिवासी संग्रहालय जळगाव जिल्ह्यातील आदिवासी भागात आदिवासी कांतिकारक बिरसा मुंडा संग्रहालय निर्माण करण्यात यावे, शासकीय जनगणनेत आदिवासींना आदिवासी धर्म कोड लागू करावा, शैक्षणिक नेोंदीमध्ये आदिवासी धर्म कोड देण्यात यावा, सातपुडा डोंगर पायथ्याशी आदिवासींना गावातील नागरिकांना शिबिर घेऊन रेशनकार्डचे वाटप करणे, आदिवासी समाज बांधवांची जातीची त्वरित वितरीत करण्यात यावेत, अशा विविध मागण्यांचे निवेदन उप जिल्हाधिकारी तथा फैजपूर उपविभागीय अधिकारी देवयानी यादव यांना देण्यात आले.
निवेदन देतेवेळी आसेमंचे संस्थापक-अध्यक्ष मुस्तफा राजु बिऱ्हाम तडवी, जिल्हाध्यक्ष मुबारक अली खाँ तडवी, उपाध्यक्ष वसीम महेबुब तडवी, शहराध्यक्ष रसीद बाबु तडवी, मुनाफ यासिन तडवी, सामाजिक कार्यकर्त्या हसीना तडवी, असलम सलीम तडवी, मुनाफ यासिन तडवी, मनोज लालखा सावदा, समशेर मिस्तरी, अलाउद्दीन (गोंडू) तडवी, राजेश नबाब, मरेखा सायबु, इक्बाल संजू, इस्माईल वकील, राजू छबू चिंचाटी तर कार्यालयीन सहकार्य म्हणून मंडळाधिकारी हनिफ तडवी, अय्युब तडवी आदी उपस्थित होते.