साईमत, बोदवड : प्रतिनिधी
शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी नुकतेच धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. प्रमुख मागण्यांचे निवेदन बोदवड येथील तहसिलदारांना देण्यात आले.
आंदोलनात शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्यांमध्ये सर्व शेती मालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवावी, शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी झाला आहे. म्हणून सक्तीची कर्ज वसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी. तसेच शेतीसाठी पूर्ण वेळ व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा, वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतीतील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावेत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी, पिक विमा होणारे शेतकऱ्यांचे बंद करून विम्याचा योग्य लाभ देणारी योजना अंमलात आणावी. मागील वर्षीचा प्रलंबित दुष्काळ निधी व यावर्षीचा दुष्काळमध्ये सरकारने शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावा. तसेच सिंचन येथील टप्पा क्रमांक एकचे काम लवकरात लवकर पूर्ण करून टप्पा क्रमांक दोनच्या कामाला सुरुवात करावी यासह सर्व मागण्यांचा समावेश आहे.
आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दगडू शेळके, तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, जिल्हा युवा उपाध्यक्ष प्रवीण मोरे, प्रसिद्धीप्रमुख नाना पाटील, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर वेडू पाटील, संतोष पाटील, संजय गुरचळ, स्वर्णसिंग हजारी, राजेंद्र चौधरी यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.