साईमत /न्यूज नेटवर्क / जळगाव
भारतीय स्टेट बँकेच्या वतीने सीएसआर योजनेअंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहासाठी पाच सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिग मशिन आणि डिस्पोजल मशिन भेट देण्यात आले. बँकेचे महाव्यवस्थापन अनिरूध्दकुमार चौधरी यांनी कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांची बुधवार दि. २४ जुलै रोजी भेट घेवून संवाद साधला त्यावेळी हे मशिन भेट देण्यात आलेत.
भारतीय स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक अनिरूध्दकुमार चौधरी हे जळगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांची भेट घेतली. बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत मुलींच्या वसतिगृहासाठी पाच सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिग मशिन विद्यापीठाला भेट देण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, उपवित्त व लेखाधिकारी सोमनाथ गोहिल, वसतिगृह रेक्टर प्रा.मनिषा जगताप तसेच बँकेच्या जळगाव विभागीय व्यवस्थापक धर्मेंद्रकुमारसिंग, मुख्य व्यवस्थापक सागर खेडकर, व्यवस्थापक अशिष जाधव व सागर मोदी तसेच बँकेचे अधिकारी सुयोग पाटील आणि अमोल महाजन हे उपस्थित होते. यावेळी चौधरी यांनी बँकेच्या विविध योजनांविषयी कुलगुरुंसोबत चर्चा केली.