साईमत, नाशिक : प्रतिनिधी
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने टंचाईला तोंड देण्यासाठी पाणी, चारा आणि मजुरांच्या हाताला काम देण्याचे नियोजन सुरू कराव्ो, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक झाली. खासदार हेमंत गोडसे, आमदार दिली दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सुहास कांदे, सरोज आहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात 30 टक्केच पाऊस झाला, साधारण 92 पैकी 53 महसूल मंडळात 21 दिवसांचा खंड पडला आहे. 60 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. 41 गावात पेरण्याच झालेल्या नाहीत. पीक विमा उतरविलेला नाही अशा शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण नसेल म्हणून हा विषय शासनाकडे नेला जाईल. दरम्यान टंचाई स्थितीत शेतकऱ्यांच्या तीव्र भावनांचे भान ठेवा अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.जनावरांना 4 महिने पुरेल एवढा चारा आहे, जिल्ह्यात 1 कोटी 35 लाखांचे बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांना बियाणे दिले जातील. पश्चिम पट्टीतील तालुक्यात चारा जपून ठेवा जिल्ह्यात 13 तालुक्यातील 9 तालुक्यात 526 बाधित जनावरे आहेत, त्यात 55 जनावरे गंभीर आहेत. 9 लाख डोस दिल्यानंतर लम्पीचा प्रादुर्भाव होत आहे. नाशिक जिल्ह्यात सौर कृषी योजना राबविली जाणार असून आठवड्याअखेर आराखडा पूर्ण होईल. त्यात 188 पैकी 88 उपकेंद्रात प्रकल्प राबविण्याचे प्रयत्न आहेत. 1 मेगावॉट वीजनिर्मितीला 5 एकर जागा लागते त्याची कार्यवाही सुरू झाली.