अनाथ मुलांच्या पाठीशी ‘आधारवड’ म्हणून खंबीरपणे उभा

0
14

साईमत/ न्यूज नेटवर्क । पाळधी, ता.धरणगाव ।

गरजू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी आणि आपणही समाजाचे देणे लागतो, या उद्देशाने उपक्रम हाती घेतला आहे. अनाथ विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक बाबींसाठी पालकत्व स्वीकारले आहे. विद्यार्थ्यांनी सतत संघर्ष करून लढत रहा यश निश्‍चित मिळेल. अनाथ, गरजू मुलांच्या शैक्षणिक आणि सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबध्द आहे. पुढील शिक्षणासाठी अनाथ मुलांच्या मागे ‘आधारवड’ म्हणून खंबीरपणे उभा राहणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर आयोजित अनाथ, गरजू मुलांना शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.

मोलाचा हातभार विद्यार्थ्यांसाठी ठरणार आधार

शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अनाथ, गरजू मुलांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी पालकत्व स्वीकारले आहे. सामाजिक भान ठेवून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. त्यांनी केलेला मोलाचा हातभार विद्यार्थ्यांसाठी आधार ठरणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यात सुमारे १ हजार १०० मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

गरजुंच्या मदतीसाठी धावणारा ग्रुप

‘जीपीएस मित्रपरिवार’ आणि ‘विकी बाबा युवा मंच’ने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहे. समाजातील वंचित व गरजू लोकांसाठी वेळोवेळी धावून जाणारा, उपयोगी पडणारा ग्रुप म्हणून स्वता:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापूर्वीही सुमारे ५०० दिव्यांगांना ई बाईक, भजनी मंडळांना भजनी साहित्य, कामगारांना कीट वाटप केले आहे. गुणवंत विद्यार्थी सत्कार, आरोग्य सेवेच्या कार्यासह विविध सामाजिक उपक्रम राबविले असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. प्रास्ताविकात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी कार्यक्रमाची माहिती विषद करून अनाथ मुलांना सदैव मदतीचा हात दिला जाईल, अशी ग्वाही दिली. सूत्रसंचालन माजी प्राचार्य प्रा. सचिन पाटील तर आभार ‘विकी बाबा युवा मंच’चे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी मानले.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, पवन सोनवणे, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे, प्रेमराज पाटील, जनाआप्पा कोळी, राष्ट्रवादीचे नाटेश्‍वर पाटील, नगरसेवक मनोज चौधरी, विजय महाजन, वासुदेव चौधरी, धीरेंद्र पुर्भे, तालुका संघटक रवींद्र चव्हाण, डॉ. कमलाकर पाटील, सचिन पवार, पी.के.पाटील, जितू पाटील, उपतालुका प्रमुख प्रमोद सोनवणे, मोहन पाटील, बालाशेठ लाठी, वासुदेव सोनवणे, पिक संरक्षणचे चेअरमन दगडू चौधरी, राजेंद्र पाटील, उगलाल पाटील, शाळेचे चेअरमन विक्रम पाटील युवा सेनेचे भैया मराठे, अमोल पाटील यांच्यासह जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी, सरपंच, जीपिएस मित्र परिवार, विकी बाबा युवा मंच, शिवसेना, युवा सेना महिला आघाडी, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here