Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»Pachora:स्टॅम्प पेपर घोटाळा उघड; ५०० रुपयांच्या ‘जादा’ मागणीने वेंडर एसीबीच्या जाळ्यात
    पाचोरा

    Pachora:स्टॅम्प पेपर घोटाळा उघड; ५०० रुपयांच्या ‘जादा’ मागणीने वेंडर एसीबीच्या जाळ्यात

    saimatBy saimatMarch 18, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Pachora: Stamp paper scam exposed; Vendor in ACB's net for 'excessive' demand of Rs 500
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाचेच्या जाळ्यात स्टॅम्प वेंडर; भाऊसह रंगेहात अटक

    साईमत/पाचोरा / प्रतिनिधी

    पाचोरा शहरात स्टॅम्प पेपर विक्रीतील अनियमिततेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत अधिकृत स्टॅम्प वेंडर आणि त्याच्या भावाला रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम आकारत लाच मागणाऱ्या या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली आहे.

    तक्रारदारास वैयक्तिक कामासाठी ५०० रुपये किंमतीचे १० स्टॅम्प पेपर आवश्यक होते. यासाठी ते दि. १५ मार्च २०२६ रोजी पाचोरा येथील जामनेर रोडवरील ‘प्रशांत झेरॉक्स’ येथे गेले. येथे अधिकृत स्टॅम्प वेंडर योगेश ईश्वरलाल संघवी याने प्रति स्टॅम्प ५५० रुपये दर सांगत एकूण ५,५०० रुपयांची मागणी केली. शासनाने ठरविलेली किंमत ५०० रुपये असताना अतिरिक्त ५० रुपये का आकारले जात आहेत, असा जाब विचारल्यानंतरही “५५० रुपयेच लागतील” असा ठाम पवित्रा संघवीने घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.

    लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने दि. १७ मार्च रोजी जळगाव एसीबी कार्यालयात तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीच्या आधारे एसीबी पथकाने त्याच दिवशी पडताळणी केली असता, १० स्टॅम्प पेपरसाठी ५,००० रुपये अधिकृत रक्कम असताना ५,५०० रुपयांची मागणी पुन्हा करण्यात आली. यातील अतिरिक्त ५०० रुपयांची रक्कम ही लाच म्हणून स्वीकारली जात असल्याचे स्पष्ट झाले.

    दरम्यान, पंचासमक्ष रचलेल्या सापळ्यात योगेश संघवीचा भाऊ प्रशांत ईश्वरलाल संघवी याने ही ५०० रुपयांची लाच रक्कम स्वीकारताच एसीबी पथकाने तत्काळ दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.

    ही कारवाई एसीबी, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, बाळू मराठे व भूषण पाटील यांच्या पथकाने सापळा यशस्वी केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत.

    या कारवाईमुळे स्टॅम्प पेपर विक्रीत होत असलेल्या गैरप्रकारांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून अशा प्रकारच्या तक्रारी पुढे आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    MSRTC BUS : महाराष्ट्रातील सर्व सरकारी एसटी बस इलेक्ट्रिक होणार; ‘लालपरी’चा नवा काळ

    March 17, 2026

    Pachora : अश्लील व्हिडिओचा राग तरुणाची निर्घृण हत्या, पती-पत्नी अटकेत

    March 14, 2026

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.