इंदिराबाई ललवाणी विद्यालयाच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत विजयी घोडदौड

0
18

नाशिक विभागीय स्पर्धेसाठी सुमित चिंचोले, राजकुमार जोशी, क्रॉस कंट्री संघ ठरला पात्र

साईमत/जामनेर/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य क्रीडा-युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद-जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय शासकीय मैदानी स्पर्धा जळगावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे नुकत्याच घेण्यात आल्या. त्यात जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयातील वयोगट १९ वर्षाच्याआतील खेळाडूंनी मैदानी स्पर्धेत विजयी घोडदौड केली आहे.

सर्व विजयी खेळाडूंचा राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कारार्थी किशोर चौधरी, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे संचालक तथा जिल्हा सचिव राजेश जाधव, कार्याध्यक्ष डॉ.विजय पाटील, जळगाव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, प्रा.इक्बाल मिर्झा, देविदास महाजन, राज्य पंच ममता शर्मा, पंकज वराडे, इंदिराबाई ललवाणी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक जी.सी.पाटील, प्रा.समीर घोडेस्वार आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विजयी खेळांडूमध्ये ११० मीटर अडथळा शर्यतीत प्रथम सुमित संजय चिंचोले, भाला फेकमध्ये द्वितीय राजकुमार रखमाजी जोशी, ४ कि.मी. क्रॉस कंट्री संघात प्रथम नेहा सुनील देशमुख, पूनम श्याम देशमुख, अंजली गजानन पंडित, प्रतीक्षा परमेश्वर तेली (सर्व इयत्ता १२ वी), तनुजा जीवन चौधरी (११ वी), मेघा गजानन सुशीर (११ वी), ६ कि.मी. क्रॉस कंट्रीत प्रतीक प्रमोद पाटील (१२ वी) यांचा समावेश आहे. सर्व खेळाडूंची नाशिक विभागीय स्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख जी.सी.पाटील, प्रा.समीर घोडेस्वार यांचे मार्गदर्शन लाभले.

यांनी केले यशस्वी खेळाडूंचे कौतुक

यशस्वी खेळाडूंचे इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, मुख्याध्यापक एस.आर.चव्हाण, उपमुख्याध्यापक एस.एन.चवरे, उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, पर्यवेक्षक प्रा.के.डी. निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी.जी.अत्तरदे, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक बी.पी.बेनाडे, जी.डी.कचरे यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here