पाळधीला ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ मोहिमेला भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालयात उत्स्फूर्त प्रतिसाद

0
19

पाळधीला ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ मोहिमेला भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालयात उत्स्फूर्त प्रतिसाद

साईमत।पाळधी, ता.धरणगाव ।प्रतिनिधी।

येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयाबरोबरच गावातील बस स्थानक, PWD कार्यालयात परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र व श्रीराम मंदिर आणि बाजारपेठ परिसर आदी प्रमुख स्थळांची स्वच्छता करण्यात आली. त्याबरोबरच बसस्थानकातील उपस्थित नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष विक्रमराव पाटील, प्रतापराव पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. संजय व्ही.बाविस्कर, रासेयोचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोहिमेसाठी सहकार्य करुन अशा अभिनव मोहिमेचे भरभरून कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here