साक्री तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
10

साईमत, साक्री : प्रतिनिधी

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ साक्री तालुका सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी तालुका बंदचे आयोजन केले होते. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. बाजारपेठेत शुकशुकाट होता. बंद शांततेत पार पडला.

साक्री तालुका मराठा समाज बांधवांनी सकाळी दहा वाजता साक्री पोलीस स्टेशन समोरील छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या प्रांगणातील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून निषेध आंदोलनाला सुरूवात केली. साक्री शहरातील सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने, बाजारपेठेतील सर्वच दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली हेती. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील वैद्यकीय सेवा, एस.टी. बसेस तसेच शाळा सुरू होत्या. या व्यतिरिक्त सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. याशिवाय पिंपळनेरसह काही मोठ्या गावातही बंद पुकारण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here