दीप प्रज्वलन करून ‘भगवद्गीता’ या ग्रंथाचे पूजन करण्यात आले.
साईमत/फैजपूर/प्रतिनिधी :
गीता जयंतीनिमित्त कुसुमताई मधुकरराव चौधरी माध्यमिक विद्यालयात आयोजित भाषण स्पर्धा उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहिणाबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका हिमाताई चौधरी होत्या.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ‘भगवद्गीता’ या ग्रंथाचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी गीता जयंतीनिमित्त भाषणे दिली. इयत्ता ५ ते ७ या गटातून प्रथम क्रमांक राधिका ठाकूर, द्वितीय देवेश्री बोरोले, तृतीय रुही भावसार तसेच इयत्ता ८ ते १० या गटातून प्रथम क्रमांक शर्वरी महेश्री, द्वितीय अथर्व नेहते, तृतीय श्रद्धा गालफाडे या विद्यार्थ्यांनी मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भगवतगीता बक्षिस म्हणून देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी दैवी संपत्तीची ३२ लक्षणे यांच्या पाट्या तयार करून आणल्या होत्या.
स्पर्धेस परीक्षक म्हणून प्रा.व्ही.जी.कपले, वाय.आर.लोधी होते. यावेळी सुरेश महाजन, विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.एम.बोंडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अमृता लांडे यांनी केले. प्रास्ताविक व आभार डी.के.होले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
